निवडणूकी पुर्वी केलेल्या आरोपांची शहानिशा करावी ; भ्रष्टाचाराचे आरोप खरे की स्टंट ?
करमाळा समाचार – सुनिल भोसले
पिंपळवाडी ता. करमाळा येथे निवडणुकीपुर्वी सत्ताधाऱ्यांवर विविध भ्रष्टाचाराचे आरोप करुन रान उठवणाऱ्या आरोपांची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी किंवा ते आरोप फक्त निवडणुकीसाठी स्टंट होता हे स्पष्ट करण्यासाठी चौकशी करुन नवा निधी देण्यात येऊ नये अन्यथा प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कार्याध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांनी दिला आहे.

मौजे पिपळवाडी ता. करमाळा या गावामध्ये झालेल्या ऐन निवडणुकीपुर्वी ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य याच्या विरोधात शमदन रामचंद्र पाटिल यांनी काही भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. परंतू ते आरोप खरे आहेत किंवा फक्त स्टंट होता.
यामुळे गावातील लोकांची दिशाभूल करून बदनामी करून मत मिळविण्यासाठी कलेली फसवणूक किंवा खरच गावच्या विकासात मागच्या ग्रामपंचायत सदस्यांनी विकासाच्या नावाखाली केलेली फसवणूक होती का ? हे फक्त बिनबुडाचे आरोप होते, याचा तपास लवकरात लवकर झाला पाहीजे आणि यामधे जो कोणी दोषी असेल त्यावर कायदेशीर रित्या फौजदारी गुन्हे दाखल करून त्याना त्याची सजा दिली पाहीजे आणि जोपर्यंत चौकशी अहवाल सादर होत नाही तोपर्यंत पिंपळवाडी साठी आलेला कुठलाही निधी खर्च करू दिला जाणार नाही असा इशारा ही दिला गेलेला आहे. अन्यथा आम्ही आंदोलन करू अशी मागणी प्रहार संघटनेचे वतीने केली आहे.
