करमाळाक्राईमसोलापूर जिल्हा

जबरी दरोडा व मारहाण मधील सराईत फरारी आरोपी अटकेत ; करमाळा पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी – करमाळा

पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना गोपनीय माहिती मिळाली की करमाळा पोलीस ठाणे कडील तसेच रेल्वेमध्ये दरोडा,जबरी चोरी मधील फरारी आरोपी जिंती भगतवाडी केत्तुर गाव शिवारात आला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक कोकणे यांनी लागलीच सपोनी कुंजीर,पोलीस नाईक चंद्रकांत ढवळे, पो कॉ तोफिक काझी, यांचे पथक रवाना केले.

वरील पथकाने पारेवाडी गावच्या शिवारात सापळा रचून करमाळा पोलीस ठाणे कडील दरोडा, जबरी चोरी मारहाण मधील फरारी संशयीत आरोपी खाजा राजेंद्र काळे वय 40 राहणार भगतवाडी तालुका करमाळा यास मोठ्या सिथाफीने अटक केली. सदर आरोपी वर करमाळा पोलीस ठाणे मध्ये भादवि कलम 326 प्रमाणे गुन्हा दाखल असून करमाळा, दौंड,कुर्डुवाडी,बारामती येथे आज पर्यंत दरोडा ,जबरी चोरी, दरोड्याची पूर्वतयारी यासारखे 11 गुन्हे दाखल आहेत सदरचा आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदरचा आरोपी कोणाला पाहिजे असल्यास तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोकणे यांनी केले आहे.

सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक मॅडम तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव,उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ विशाल हिरे ,पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाणे कडील डीबी पथकाने केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल हराळे करत आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE