मलवडी परिसरात मिळाला मानवी शरीराचा एक अवयव ; पोलिसांचा शोध सुरु
करमाळा – प्रतिनिधी
शरीराचा एक अवयव

जेऊर ते केम जाणाऱ्या रेल्वे मार्गाजवळ मौजे मलवडी तालुका करमाळा गावचे शिवारामध्ये एका व्यक्तीच्या पायाचा पंजा मिळून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. सदरचा पंजा कोणाचा आहे यासंदर्भात परिसरात शोधाशोध केली. परंतु संबंधित व्यक्तीचे इतर शरीराचा भाग मिळून आला नाही. तरी या संदर्भात कोणाला काही माहिती मिळाल्यास करमाळा पोलीस स्टेशनची संपर्क साधावा असे आवाहन पोलीस हवालदार सी.सी. पाटील यांनी केले आहे.
अनोळखी इसमाचा रेल्वे ची धडक बसून किंवा रेल्वे अपघातानंतर हा पंजा त्या ठिकाणी आला असल्याची प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सदरचा पंजा हा २८ जून रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मिळून आला आहे.

करमाळा पोलीस स्टेशन हद्दीतील जेऊर ते केम जाणाऱ्या रेल्वे मार्गाजवळ मौजे मलवडी गावच्या शिवारामध्ये रेल्वे दगड क्रमांक ३५२/३/४ मध्ये एक मानवी अवयवाचा पायाचा पंजा मिळून आला आहे. सदर मानवी अवयव पायाचा पंजा हा करमाळा येथील कॉटेज हॉस्पिटल येथे आणल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदरचा पंजा हा डाव्या पायाचा असल्याबाबत अभिप्राय दिला आहे.
अधिक माहितीसाठी करमाळा पोलीस ठाणे फोन क्रमांक ०२१८२२२०३३३, हवालदार मोबाईल नंबर ८३०८८५४४५५ यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.