करमाळासोलापूर जिल्हा

जे .के.फाऊंडेशन तर्फे ऊस तोडणी मजूरांच्या मुलांना नवीन कपडे वाटप

करमाळा समाचार – अमोल जांभळे

वाशिंबे :- उजनी लाभक्षेत्रातील ऊस पट्ट्यातील गावांमध्ये घरोघरी विद्युत रोषणाई गोड धोड पदार्थ करुन मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी होत आहे.परंतु गावकुसाबाहेरील पालावर ऊसतोडणी कामगारांना गोड धोड पदार्थ तर दूरच,ना अंगावर नीट कपडे, ना पायात चप्पल, गरिबेचे चटके सहन करत भल्या पहाटे पासुन ते रात्री उशिरापर्यंत ऊसाच्या फडात रहावे लागते. लहान मुलांना छोट्याशा साडीचा पाळणा शेताच्या बांधावर बांधलेला असतो.

ऊन वारा, विचंवा, काट्यांचे भय या सर्वांना तोंड देत मायमावल्या फडात उतरून ऊसतोडणी करत आहेत.जगण्यासाठीचा त्यांचा संघर्ष कधी संपणार, त्यांच्या व्यथांवर फुंकर कोण घालणार, त्यांच्या जीवनात आनंदत्सोव कधी साजरा होणार हा प्रश्न आजही तसाच अनुत्तरित आहे.वाशिंबे येथील जे.के.फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री.अमोल भोईटे यांनी सामाजिक बांधिलकीतून नेहमी समाज उपयोगी काम आज पर्यंत केले.

रक्तदान सारखे महान कार्य दरवर्षी फाऊंडेशन राबवत आहे. गरजुवंताना रक्त पिशवी उपल्बध करून दिले. वाशिंबे परिसरातील ऊस तोडणी साठी आलेल्या मजुरांच्या मुलां-मुलींना नवीन कपडे वाटप केले. लेकरांच्या चेहर्यावरील आनंद द्विगुणित झालेला पाहुन समाधान वाटले असे अमोल भोईटे यांनी नमुद केले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE