केम मध्ये कोवीड मोहिमेतील अंगणवाडी सेविकांचा सत्कार
प्रतिनिधी सुनील भोसले
करमाळा तालुक्यातील केम येथील करोनाच्या कोवीड मोहिमेतील अंगणवाडी सेविकेचा सत्कार शिवसेना महिला आघाडी तर्फे करण्यात आला. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा वर्षा चव्हाण यांच्या हस्ते शिक्षण सेविकाना फेटे बांधून व शाल , नारळ भेट देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी वर्षा चव्हाण यांनी सावित्री ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी मंगल कावळे, अनुसया लोंढे, छाया ओहोळ, अंजली लोखंडे, मंगल पोकळे, पदमीनी टागंडे, सरस्वती कुडे, सुनंदा हरणावळ, सविता गवळी, वैशाली बिचितकर, मनिषा करळे, राणी तळेकर, रोहिणी नागणे, शिवसेना शहर अध्यक्ष आशा मोरे आदि मान्यवर उपस्थित होत्या.
यावेळी वर्षा चव्हाण यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना सध्याच्या कोविड 19 च्या अभूतपूर्व परिस्थितीत अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी महिला वर्ग जिवावर उदार होऊन राष्ट्रीय कर्तव्य बजावत आहेत.याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करणे हा सर्वाचाच कर्तव्याचा भाग आहे असे सांगितले. याबरोबरच शिक्षणाचा हा अंगणवाडी सेविका हाच खरा शिक्षणाचा पाया आहे म्हणून पहिला सन्मान प्राधान्याने केला पाहिजे असे मतही यावेळी व्यक्त केले. शेवटी सर्वांचे स्वागत व आभार शहराध्यक्षा आशा मोरे यांनी मानले
