करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कंदरच्या डोकेंना पुरस्कार

चिखलठाण( बातमीदार)

कंदर तालुका करमाळा येथील प्रगतशील शेतकरी कृषी पंडित किरण डोके यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सोलापूर येथील वि.गु.शिवदारे प्रतिष्ठाणचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला असून उद्या गुरुवार १७ ऑगस्ट रोजी सोलापूर येथे हिराचंद नेमुन वाचनालय संकूल मधील किर्लोस्कर सभागृहात ४:३०वाजता हा कार्यक्रम संपन्न होत आहे .

डोके यांनी आपल्या शेतात निर्यातक्षम केळी उत्पादन घेऊन ती स्वतः निर्यात करूत के.डी. एक्सपोर्ट च्या माध्यमातून तालुक्यातील इतर शेतकऱ्यांची ही केळी निर्यात करत असून तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध सुविधा मिळाव्यात यासाठी ते प्रयत्नशील आहेत. केळी उत्पादन व निर्यात या क्षेत्रात त्यांनी केलेल्या भरिव कामगिरीबद्दल या प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. राजीव मधुकर प्रधान,सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल दि राम रेड्डी व पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सकाळचे निवासी संपादक अभय देवाणजी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE