आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त आदर्श पत्रकार पुरस्काराची घोषणा ; आज सायंकाळी होणार कार्यक्रम
करमाळा समाचार सुनिल भोसले
आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त सन २०२० सालचे यंदाचे शहर व ग्रामीण मधून आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण समारंभ आज शनिवार सायंकाळी ५.३० वा. आयोजित करण्यात आला आहे. यावेळी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मा.गणेश करे-पाटील यांच्याहस्ते तर प्रमोद (बाबा)झिंजाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. सदरचा कार्यक्रम पत्रकार कट्टा करमाळा तालुका पत्रकार संघ, जीन मैदान शाँपिंग सेंटर येथे होणार आहे.

पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष महेश चिवटे यांनी सदर कार्यक्रमाबाबत माहिती दिली असून दरवर्षी दोन पत्रकारांना हा सन्मान दिला जातो. मागील वेळी दै. संचारचे किशोर कुमार शिंदे यांना तर ग्रामीण मधून दिव्य मराठीचे गणेश जगताप यांना पुरस्कार दिला गेला होता. यंदा दिला जाणारा पुरस्कार अद्याप जाहीर केला नसला तरीही आज सायंकाळी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये ते दोन नावे समोर येणार आहेत.
