E-Paperताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आरक्षण सोडत जाहीर ; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तारीख केली जाहीर

करमाळा समाचार 

आज जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे मतमोजणी पूर्ण होऊन नूतन सदस्य निवडण्यात आले आहेत. त्यामुळे सरपंच निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. नियमाप्रमाणे ग्रामपंचायत निकाल लागल्यानंतर 30 दिवसाच्या आत सरपंच आरक्षण घोषित करणे अपेक्षित आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी 27 जानेवारी या तारखेला सरपंच आरक्षणाची घोषणा केली आहे.

महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग मुंबई यांनी त्यांच्याकडील दिनांक 5 मार्च 2020 रोजी राजपत्र प्रसिद्ध करून सोलापूर जिल्ह्यातील सन २०२० ते २५ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग, खुला आणि महिला सरपंच पदी निश्चित केलेली आहेत.

politics

महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक नियम 1964 मधील नियम अन्वये सरपंच निवडीबाबत 8 डिसेंबर 2020 रोजीच्या आदेशान्वये कळवले आहे. यापूर्वी 11 डिसेंबर रोजीच्या आदेशाने सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती ठेवण्याबाबत कळवले होते. तर 16 डिसेंबर रोजी च्या पत्रान्वये सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम व सरपंच उपसरपंच पदाची निवड निवडणूक निकाल प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून तीन दिवसाच्या आत घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी 27 जानेवारी ही तारीख घोषित केली आहे

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE