करमाळासोलापूर जिल्हा

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्राची वरात पाहुण्याच्या दारात

करमाळा समाचार 

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी परिवार संवाद (rashtravadi pariawar sanvad) यात्रा याचं नियोजन करण्यात आलेले आहे. त्या निमित्ताने ते बुधवारी करमाळ्यात दाखल होत असताना त्यांच्या संवादाचं ठिकाण मात्र अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांच्या कार्यालयात ठेवले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची वरात ही राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या दारात नसून अपक्ष आमदारांच्या दारात असल्याचे दिसून येत आहे.

आमदार संजयमामा शिंदे हे राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर जरी निवडून आले असले तरी सध्या सुरू असलेली यात्रा ही फक्त पक्ष वाढीच्या उद्देशाने असावी ती पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन पदाधिकारी स्वतंत्रपणे पक्ष वाढीसाठी बोलतील किंवा नेत्याने कान टोचले तरी ते पक्षातील पदाधिकाऱ्यांसमोरच टोचतील इतर गटाचे नेत्यांसमोर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना पक्षश्रेष्टी नेमके काय सल्ले देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विधानसभा निवडणुकीत रश्मी बागल यांनी राष्ट्रवादी सोडत शिवसेनेत प्रवेश केल्याने अनेकांच्या अपेक्षा या राष्ट्रवादीकडून लोकसभेला उमेदवार म्हणून रिंगणात असलेले संजयमामा शिंदे यांच्या कडे लागून राहिल्या होत्या. परंतु त्यांनीही राष्ट्रवादीतून उभारण्यास नकार दिल्याने अखेर राष्ट्रवादीला दुसरा उमेदवार समोर करावा लागला होता. पण ऐन निवडणूकांच्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीने आपला उमेदवार थांबवत अपक्ष उमेदवार म्हणून उभा असलेल्या संजयमामा शिंदे यांना उमेदवारी देत निवडून आणण्यास सहकार्य केले होते.

राष्ट्रवादीच्या अनेक कार्यक्रमांचे नियोजन व पदाधिकाऱ्यांच्या बैठका तसेच नवीन पदाधिकारी निवडी व वरिष्ठ पातळीवरील नेत्यांसोबत सलोख्याचे संबंधामुळे संजयमामा शिंदे (sanjaymama shinde) हे कायमच राष्ट्रवादीची असल्या प्रमाणे वाटतात पण ते राष्ट्रवादीत असल्याबाबत कधी त्यांनी हे मान्य केले नाही व इतर नेत्यांनीही ठामपणे सांगितले नाही. त्यामुळे ते जरी राष्ट्रवादीचे असले तरी ते अद्यापही अपक्ष आमदार असून राष्ट्रवादीचा लेबल किंवा शिक्का त्यांच्यावर लागलेला नाही अशी परिस्थिती असतानाही राष्ट्रवादीचे वतीने आयोजित केलेली ही परिवार यात्रा शिंदे कार्यालयात घेतल्याने संभ्रम निर्माण होत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE