करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

भारतीय जनता पार्टी उद्योजक आघाडी करमाळा तालुकाध्यक्षपदी कुलकर्णी

करमाळा समाचार –

संजय साखरे भारतीय जनता पार्टी उद्योजक आघाडी करमाळा तालुकाध्यक्षपदी उद्योजक क्लासिक ऑईल कंपनीचे मालक संतोष काका कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे , शहराध्यक्ष रामभाऊ ढाणे यांनी निवड पत्र देऊन त्यांची निवड केली आहे.

उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांनी एक शेतकरी कुटुंबात जन्म घेऊनही कुठलाही वारसा नसताना प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वकर्तुत्वावर क्लासिक ऑइल कंपनी सुरू केली. रोजगारनिर्मिती उद्योग व्यवसायिकांना त्यांचे कार्य युवा पिढीला प्रेरणादायी आहे असे मत गणेश भाऊ चिवटे यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पार्टी उद्योजक विकास आघाडीच्या माध्यमातून करमाळा युवकांना मार्गदर्शन करून उद्योजक घडवण्याचे काम करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संतोष काका कुलकर्णी यांचा हार फेटा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे,तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे , किसन मोर्चा जिल्हा सरचिटणीस नरेंद्रजी ठाकूर , पत्रकार दिनेश मडके वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार, सोमनाथ घाडगे, जयंत काळे पाटील, किरण शिंदे, विश्वनाथ घोलप, संजय किरवे, शरद कोकीळ निलेश गंधे , निखिल बरूटे, सुधीर कुलकर्णी गजानन कुलकर्णी चैतन्य पाटील आनंद पाटील सर दिगंबर ठोंबरे दर्शन कुलकर्णी व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE