करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

साडे येथे सशस्त्र दरोडा ; वृद्ध दांपत्याला मारहाण करमाळ्यात उपचार सुरु

करमाळा – विशाल (नाना ) घोलप

करमाळा तालुक्यातील साडे येथे सशस्त्र दरोडा टाकून मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये वृद्ध पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर करमाळा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदरची घटना शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास साडे परिसरात घडले आहे. या ठिकाणी दोन घरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. त्यामध्ये दोन्ही घरांमध्ये दोघे व्यक्ती असल्याने मारहाण करण्यात आले आहे. तर परिसरातील घरांना कड्या लावून सदरचा प्रकार करण्यात आला.

आधीच पावसाने कंबरडे मोडलेले असताना आता दरोडेखोरांचा धुमाकुळ पहायला मिळत आहे. शनिवारी मध्यरात्री दरोडा टाकण्याच्या उद्देशाने सात ते आठ जण साडे येथील गावात घुसले होते. परिसरातील घरांना त्यांनी बाहेरून कड्या लावल्या. बाहेरून पाळत ठेवली व गावातील रघुनाथ गोमे यांच्या घरामध्ये घुसून दोघाही पती-पत्नी दांपत्याला मारहाण करून त्यांच्याकडून मुद्देमाल काढण्याचा प्रयत्न केला.

तसेच छगाबाई घाडगे यांच्या घरी ही सदरचे दरोडेखोर गेले होते. त्या ठिकाणीही मारहाण करण्यात आली. या संदर्भात झालेल्या मारहाणी नंतर दोघांवर सध्या उपचार सुरू असून नेमका मुद्देमाल किती गेला आहे. याबाबत अधिक माहिती मिळालेली नाही तरी घटनास्थळी पोलिसांनी भेट दिल्या असून तपास सुरू आहे. सदरचा प्रकार घडल्यामुळे परिसरातील गावांमध्ये भितीदायक वातावरण आहे. तर गावोगावी सतर्क राहण्याचा आवाहन करण्यात आले आहे.

ads

रात्रीच्या वेळी अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने लोकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने उचित पावले उचलणे गरजेचे आहे.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE