करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यात ऊसतोड मजुरांचे आगमन

करमाळा समाचार -संजय साखरे

गेल्या वर्षी मे पर्यंत चाललेला गाळप हंगाम चालू वर्षी सरकारने एक ऑक्टोबर पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या गाळप हंगामासाठी ऊसतोड करणाऱ्या टोळ्यांचे आगमन तालुक्यात होऊ लागले आहे. कारखाने सुरू होण्यास अद्याप एक महिना कालावधी आहे. कदाचित परतीच्या पावसाने जर जोरदार हजेरी लावली तर गाळप हंगाम उशिरा ही सुरू होऊ शकतो. करमाळा तालुक्याच्या सर्व भागात यंदा अद्यापही समाधानकारक पाऊस पडला नसल्याने शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. याशिवाय उजनी बॅक वॉटर सोडून असलेल्या उसाची अद्याप पुरेशी वाढ ही झालेली नाही.

गेल्या वर्षी लांबलेला गाळत हंगाम व यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, ऊसतोड्यांकडून व वाहनमालकांकडून शेतकऱ्यांची झालेली लुटमार या सर्वच पार्श्वभूमीवर शासनाने यंदा साखर कारखाने लवकर चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास सर्वच साखर कारखान्यांनी वाहतूकदारांना पहिल्या हप्त्याचे वाटप केले आहे. त्यामुळे वाहन मालकांनी टोळ्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता म्हणून आपल्या टोळ्या लवकर आणण्यास प्राधान्य दिले आहे.

एका मुकादमा कडे अनेक टोळ्याअसल्याने उचल देणाऱ्या वाहन मालकाला तो लवकर टोळी नेण्याचा आग्रह करतो. त्यामुळे वाहन मालकांनी टोळ्याना आणण्यास सुरुवात केली आहे.असे असले तरी कारखाने सुरू होईपर्यंत त्यांचा सांभाळ करण्यास वाहन मालकांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

ads

अजून कारखाना सुरु होण्यास एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी असला तरी कोयते पळवा पळवी चे पार्श्वभूमीवर मी नंदुरबार येथून टोळी आणली आहे. आता एक महिनाभर या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात रोजंदारीवर मजूर जाऊन त्यांची ते उपजीविका करणार आहेत.

– किशोर खराडे, वाहन मालक सावडी- तालुका करमाळा

आमच्याकडे फारसे काम नसल्याने आमची उपजीविका ऊस तोडीवर अवलंबून आहे .आता कारखाना चालू होईपर्यंत आम्ही शेतावर रोजंदारीने जाणार आहे. नाना साहेबराव भिल ,ऊसतोड मुकादम मु. पो. नेहाली तालुका- नंदुरबार जिल्हा- नंदुरबार

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE