पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी प्रा. राजेश गायकवाड यांची निवड
प्रतिनिधी – सुनिल भोसले
दक्ष पत्रकार संघ राहुरी चे संस्थापक अध्यक्ष श्री रोहिदास दातार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गायकवाड यांच्या निवडीचे पत्र श्री दातार यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले.

यावेळी बारामती तालुक्याचे संघटक व मार्गदर्शकपदी श्री विकास मिंड, फलटण तालुक्याचे संघटक पदी श्री रामभाऊ पाटोळे, फलटण तालुका अध्यक्ष पदी श्री अनिल चव्हाण तर बारामती तालुका अध्यक्ष पदी श्रीकृष्ण पवार यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत .
यावेळी बोलताना मिंड यांनी संघटना वाढीसाठी प्रयत्न करा असे आवाहन केले . तर रामभाऊ पाटोळे यांनी निवडीबद्दल सर्वांचे आभार मानले.
