करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

संगोबा येथे चोरी – चोरट्यांचा पाठलाग करुन गाडी क्रमांक दिला ; कारवाईची मागणी

करमाळा समाचार

आज पहाटे अज्ञातांकडून संगोबा पाटबंधारे चौकीतून पाणी अडवणारी दरवाजे चोरीला गेल्याची तक्रार नरुटे यांनी केली आहे. यावेळी बोरगाव येथील शशिकांत नरुटे यांनी सदर गाडीचा पाठलाग करून त्याचा गाडी क्रमांक घेतला व पोलिसांकडे दिला आहे. त्यावर कारवाईची मागणी केली आहे.

पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान खांबेवाडी येथील शेतकरी सुंदरदास हाके व गोपीनाथ मारकड हे पहाटे फिरत असताना त्यांनी सदरची घटना नरुटे यांना कळवली. यावेळी नरुटे घटनास्थळी पोहोचले त्यावेळी पाहिले असता एक पिकअप सदरचे दरवाजे घेऊन जात आहे.

http://*चोरी झालेच्या आरोपानंतर अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट ; चोरी झालीच नसल्याचे उघड* https://karmalasamachar.com/officials-visit-the-scene-after-the-alleged-theft-it-is-clear-that-there-was-no-theft/

ads

नरुटे यांनी संबंधित गाडीचा पाठलाग केला व त्याचा गाडी क्रमांक मिळवला. तो क्रमांक पोलिसांकडे दिल्याची माहिती नरुटे यांनी दिली आहे. संबंधित पिकअप ताब्यात घेऊन मागील चोऱ्यांचाही शोध घ्यावा अशी मागणी केली आहे. त्याशिवाय संगोबा येथे पाहऱ्यासाठी चौकीदाराची नेमणूक करावी अशी विनंती केली आहे.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE