अतुल खुपसे यांच्या सह शंभर ते दिडशे आंदोलकांवर गुन्हे दाखल ; तरीही आज रास्तारोको आंदोलन आंदोलनाकडे लक्ष
करमाळा समाचार
वीज बील व बीज बंद केल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन अतुल खुपसे यांनी छेडलेल्या आंदोलनाची कोरोनाकाळात परवानगी घेतली नाही तसेच बेकायदा जमाव गोळा केल्या प्रकरणी खुपसे यांच्यासह शंभर आंदोलनकर्त्यावर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतुल खुपसे रा. उपळवाटे, ता. माढा, दिपाली डिरे, अतुल राऊत, महावीर राऊत, दत्तात्रय डिरे, संतोष राऊत, सचिन राऊत, अक्षय राऊत सर्व रा केतुर नं 1 ता करमाळा, बाळासाहेब माने, विलास मेरगळ, प्रकाश काळे, प्रकाश माळशिकारे माने सर्व रा गुलमोहरवाडी ता.करमाळा, राजेंद्र खटके, नितीन खटके, केत्तुर 2, तात्या खाटमोडे, माऊली खाटमोडे रा. दिवेगव्हाण, नाना सरवदे, जयवंत पांढरे, भय्यूजी मोरे, प्रशांत पांढरे, संतोष शिंदे, महादेव सरोदे, बापू लोकरे सर्व रा. पारेवाडी ता करमाळा, शरद एकाड सावडी यासह १०० अनोळखी आंदोलनकर्त्यावर गुन्हा दाखल केला आहे.

अतुल खूपसे यांनी पारेवाडी तालुका करमाळा येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित सबस्टेशन येथे तसेच तहसील कार्यालय करमाळा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित कारमाळा कार्यालय, येथे विनापरवाना तसेच भाजपा कार्यालय करमाळा येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित कार्यालयाने काही शेतकऱ्यांचे वीजबिल थकीत असल्या कारणावरून वीज कनेक्शन कट केल्याचे कारणावरून मोठमोठ्याने नारेबाजी केली असून सोलापूर जिल्हा दंडाधिकारी यांनी पारित केलेल्या आदेशाची कोणत्याही सबल कारणाशिवाय उल्लंघन करून केले आहे. त्यामुळे सर्वांवर कलम 269, 188, 141, 143, 147, 149 साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम 234 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
तरीही रास्तारोको आंदोलन …
मंगळवार सकाळी ठिक १० वा. अतुल खुपसे यांच्या नेतृत्वाखाली कुंभेज फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.