करमाळासोलापूर जिल्हा

उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे गुरुवारपासून दिव्यांग प्रमाणपत्र मिळणार

करमाळा समाचार 


गतवर्षी 20 फेब्रुवारी 2020 रोजी करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये आ.संजयमामा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मोहन शेगर, तहसीलदार समीर माने ,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी सागर गायकवाड , वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल डुकरे यांच्या उपस्थितीत उपजिल्हा रुग्णालयात सीझर विभाग सुरू करणे व दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळण्याची व्यवस्था करणे या विषयावरती चर्चा झाली होती .त्यानुसार करमाळा उपजिल्हा रुग्णालयात 23 जून 2020 पासून सीझर विभाग सुरू झाला असून आत्तापर्यंत दोनशेच्या आसपास सीझर त्याठिकाणी झालेले आहे .

दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी रिक्त पदे तात्काळ भरून त्यांना प्रमाणपत्र मिळण्याची व्यवस्था करा अशा सूचना त्या बैठकीदरम्यान आ. संजयमामा शिंदे यांनी दिलेल्या होत्या त्याची फलश्रुती झालेली असून येत्या गुरुवारपासून म्हणजे 18 मार्चपासून करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांगांना जुने ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र फेर तपासणी करून नवीन प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या सुविधेमुळे दिव्यांगांना विनाकारण भुर्दंड भरावा लागणार नाही.

करमाळा तालुक्यात दिव्यांगाची संख्या जास्त असून त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सोलापूरला हेलपाटे मारावे लागत होते. एवढे होऊनही काम न झाल्यास वेळ व पैसा याचा भुर्दंड दिव्यांगांना विनाकारण सहन करावा लागत होता. या सुविधेचा लाभ तालुक्यातील दिव्यांगांनी घ्यावा असे आवाहन आ. संजयमामा शिंदे यांनी केले आहे.

गुरुवारपासून दिव्यांगांनी संपर्क साधावा- डॉ. अमोल डुकरे
उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे जुने ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र फेर तपासणी करून नवीन प्रमाणपत्र व UDID कार्ड दर गुरुवारी प्रथम येणाऱ्या पन्नास दिव्यांगांना सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत देण्यात येतील. अधिक माहितीसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल कोळेकर ,मो. नं.- 9970767155 यांच्याशी संपर्क साधावा.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE