अतुल पाटलांचा मल्ल ते राजकीय प्रवास ; सभापती अतुल पाटील
करमाळा समाचार
नुकतेच सभापतीपदी विराजमान झालेले अतुल पाटील हे फक्त राजकारणी नसून त्यांची सुरुवात आखाड्यातून झाल्याचे सर्वश्रूत आहे. पण त्यांचा नेमका प्रवास कसा झाला याबाबत अधिक माहिती अनेकांना नाही. सुरुवातीच्या काळात विविध पदके मिळवल्यानंतर महाराष्ट्र केसरी हा किताब त्यांनी मिळवलेला आहे. त्यासह दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी झालेले पाटील आज करमाळ्याच्या सभापतीपदी बिनविरोध निवडून आले आहेत.

मल्ल ते सभापती प्रवास
कोल्हापूर महापौर केसरी (२००१), ८४ किलो वजन गटात महाराष्ट्र केसरी (२००४), गोल्ड मेडल २००५ व २००६, उपमहाराष्ट्र केसरी २००७, छत्रपती पुरस्कार विजेते २००७, उपमहाराष्ट्र केसरी (२०११) त्यासह मावळ केसरी, पिंपरी चिंचवड केसरी, मल्हार केसरी, शंभू महादेव केसरी, नाशिक महापौर केसरीयासह अनेक पुरस्कार व मल्ल म्हणुन कारकीर्द गाजवल्यानंतर २०१७ निवडणूक आखाड्यात पंचायत समिती कुंभेज गण सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर २०२१ सभापतीपदी वर्णी लागली आहे.
