पोलिसांसोबत हुज्जत घातलेल्या व्यक्तीला जामीन ; एप्रिल महिण्यात झाली होती अटक
करमाळा समाचार
चिखलठाण यात्रे दिवशी बंदोबस्तात असलेल्या पोलिसांबरोबर झालेल्या उद्धट वागणुकीबद्दल तसेच आरेरावी व हाणमार केल्याच्या कारणावरून गुन्ह्यात असलेल्या संशयीत आरोपीस बार्शी येथील जिल्हा व सत्र न्यायालय बार्शी येथे जामीन मंजूर केला आहे. 14 एप्रिल रोजी अटक झाली होती.

ह्याच्यात हाकिकत अशी की, चिकलठाण यात्रे दिवशी ड्युटीवर असलेल्या पोलिसां सोबत झालेल्या हुज्जत, अरेरावी आणि भांडण केल्याबाबत संशयीत आरोपीस युवराज गलांडे यास आयपीसी कलम 353 सरकारी कामात अडथळा प्रमाणे अटक करण्यात आली होती. त्यास जिल्हा सत्र न्यायालयाने पंचवीस हजाराच्या जमिनीवर जामीन मंजूर केला. आरोपीतर्फे ॲड. एन. टी. पाटील व ॲड. अमर शिंगाडे यांनी काम पाहिले.
