करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

ग्रामपंचायत महिला सदस्या आत्महत्या प्रकरणात पतीला अटक ; पोलिस कोठडी

करमाळा समाचार

तालुक्यातील निंभोरे ग्रामपंचायतच्या नुकताच कार्यकाळ संपलेल्या माजी सदस्या विजया मारकड यांनी विषारी औषध पिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर मारकड यांच्या माहेरच्या मंडळींनी विजया यांना मानसिक तसेच शारीरिक त्रास पतीकडून होत होता मारहाण केली जात होती. त्यांनी त्याच्या त्रासास कंटाळून आत्महत्या केल्याबाबत करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून त्यांच्या पतीवर करमाळ्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. सदरचा प्रकार दि ३ जुलै रोजी दुपारी तीन च्या पूर्वी घडला आहे.

महावीर साहेबराव मारकड यांच्यावर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला त्यानंतर अटक करण्यात आली तर त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे . याप्रकरणी उल्हास लांडगे (वय ६४) रा. म्हसोबा, रुई ता. माढा यांनी फिर्याद दिली आहे.

लांडगे यांचे मुलगी विजया हिचा महावीर मारकड रा. निंभोरे यांच्यासोबत सोळा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. विजयाला नवरा दारूच्या नशेत कायम मारहाण करत असल्याबाबत ती फोनवरून कळवत होती. तर तिचे आई-वडील हे नांदण्यासाठी समजूत घालत होते. यापूर्वीही डाव्या पायाच्या नडगीवर मारहाण केल्याने विजया यांचा पाय फॅक्चर झाला होता असे फिर्यादीत म्हणटले आहे.

दि ३ रोजी दुपारी तीनच्या सुमारास लांडगे यांना सदर घटनेबाबत माहिती मिळाली. यावेळी विजया हिने राहते घरी विषारी औषध पिले आहे अशी माहिती मिळाल्यानंतर तिला करमाळा येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले होते. त्यावेळी तिला मृत घोषित करण्यात आले. यावेळी तिच्या अंगावर पाठीवर मारहाण केल्याचे व्रण दिसून येत होते असेही फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक प्रल्हाद जगताप हे करीत आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE