करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांची अशी ही सामाजिक बांधिलकी, मुलांना मोफत शालेय साहित्याचे वाटप

करमाळा समाचार -संजय साखरे


राजुरी तालुका करमाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश दिगंबर जाधव यांनी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप केले आहे.

गेल्या दोन वर्षापासून ते शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. गेल्या वर्षीही त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल एवढे शालेय साहित्याचे मोफत वाटप केले होते .यावर्षी त्यांनी सुमारे 70 हजार रुपये किमतीचे शालेय साहित्य (कंपास, टिफिन, टिफिन बॅग, पाणी बॉटल, वह्या ,पेन )अशा साहित्याचे वाटप केले आहे.

गेल्या वर्षी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी शाळेला 51 हजार रुपयांची देणगी दिली होती. याशिवाय स्वखर्चातून पाण्यासाठी बोअर मारून दिला होता .उन्हाळ्यात शाळेला सुट्टी असताना देखील स्वतः होऊन ते झाडाला पाणी देतात. त्यांची ही सामाजिक बांधिलकी परिसरात कौतुकाचा विषय ठरली आहे.

सदर कार्यक्रमास सरपंच डॉ. अमोल दुरंदे,आर .आर. बापू साखरे, भाऊसाहेब साखरे ,अनिल मेजर साखरे,जयराम साखरे, मोहन शिंदे, बिबीशन जगताप, आबासाहेब टापरे, दत्तात्रय दुरंदे, स्वप्निल कुलकर्णी ,नवनाथ दुरंदे, राजेंद्र भोसले, कल्याण दुरंदे, मंगेश सराटे, भाऊसाहेब जाधव यांच्यासह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक तानवडे सर यांनी केले तर आभार सुरवसे सर यांनी मानले.

मी शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष झाल्यानंतर मुलांना दोन वर्षे मोफत शालेय साहित्य देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज जिल्हा परिषद शाळेतील मुलांना मोफत शालेय साहित्य वाटप केले आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपण हे काम करीत आहोत.

-गणेश दिगंबर जाधव अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE