बकरी ईद व एकादशी एकाच दिवशी मुस्लिम समाजाने घेतला कौतुकास्पद निर्णय
करमाळा समाचार
बकरी ईद व एकादशीच्या पार्श्वभूमीवर करमाळ्यात आज पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्यावतीने शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व स्तरातील हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते. मुस्लिम धर्मीयांचा बकरी ईद व हिंदुंची एकादशी दोन्ही एकाच दिवशी येत असल्याने सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीमध्ये मुस्लिम समाजाकडुन स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला आहे. यामध्ये केवळ नमाज पठण केले जाणार असून बकरी दिवशी एकादशी असल्यामुळे करमाळा तालुक्यात कोणत्याही प्रकारची कुर्बानी दिली जाणार नाही असे जाहीर केले आहे. यापूर्वीही हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन नवरात्र व गणपती उत्सवात पाहायला मिळते.

शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद, कलीम काझी, उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, जयराज सोनु चिवटे, जीशान कबीर, शाम सिंधी, सिकंदर सय्यद, आझाद शेख, सुरज शेख, मुस्तकीम पठाण, आयुब शेख, नासिर कबीर, फारुक जमादार, नागेश चेंडगे यांच्यासह हिंदु मुस्लिम बांधव उपस्थित होते.