मोटारसायकल अपघातात बापुसाहेब बरडे गुरुजींचे निधन
करमाळा समाचार
रावगाव तालुका करमाळा येथील बापूसाहेब बरडे गुरुजी यांचे पोथरे रस्त्यावर अपघाती निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने रावगावसह तालुक्यात शोककळा पसरली आहे.


बरडे गुरुजी हे सत्संग तसेच वधुवर मेळावा तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे चर्चेत राहणारे. कायम हसतमुख असे गुरुजी अचानक सोडुन गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. शुक्रवारी पोथरे रस्त्याने मोटारसायकलने जात असताना झाडावर धडकल्याने ते गंभीर जखमी झाले त्यांना दवाखान्यात उपचारासाठी नेण्यापुर्वी निधन झाले.
एका दिवसात दुसरा मोठा हादरा …
सकाळीच पोथरे येथीलच उषा झिंजाडे यांचा अपघाती मृत्यू चटका लाऊन गेलेला असताना गुरुजींच्या अपघाती निधनाने तालुक्याला धक्का बसला आहे.