रस्त्याच्या वादातुन मारहाण ; एक गंभीर जखमी – चौघांवर गुन्हा दाखल
करमाळा समाचार
रस्त्यावरून वहिवाट करायची नाही, जायचे नाही या कारणावरून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गजाने मारहाण केल्याप्रकरणी चार लोकांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मध्ये मारहाण झालेले ब्रह्मदेव काळे वय 65 हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना टेंभुर्णी येथे दवाखान्यात उपचारा कामी दाखल करण्यात आले आहे.

मधुकर काळे, सुहास काळे, दत्तात्रय काळे व संदीप काळे रा. वडशिवणे या चौघांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी बळीराम काळे यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वडशिवणे ता. करमाळा येथे काळे कुटुंबीय हे राहतात. त्यांची वडशिवणे येथे गट नंबर 67 तर त्यांचे चुलते मधुकर काळे यांची गट नंबर 64 चा एक अशी जमीन आहे. त्यामधून कॅनल ते कविटगाव तालुका करमाळा जाणारा कच्चा रस्ता फार व पूर्वीपासून आहे. त्या रस्त्याचा उपयोग शेतकऱ्यांना झाला आहे. तर त्या रस्त्यावरून जाऊ नये म्हणून सदरच्या चौघांचा कायम विरोध होता. त्यातूनच या रस्त्यावरून वहिवाट करू नये म्हणून फिर्यादी त्रास देत होते.
त्या उद्देशाने रस्ता खोदणे रस्ता अडवणे असे प्रकार होत होते. यातूनच वाद वाढला व मारहाणीत रूपांतर झाले. दिनांक 13 रोजी दुपारी चारच्या सुमारास हातात गज घेऊन काळे बंधू त्या ठिकाणी आले व त्यांनी ब्रह्मदेव काळे यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी इतर मध्ये पडले त्यांनाही गजाने मारहाण केली. मारहाणी मध्ये ब्रह्मदेव काळे यांना गंभीर दुखापत झाले अशी फिर्याद दिली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी टेंभुर्णी येथे दाखल केले आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास करमाळा पोलीस करत आहेत.