बेलगाम करमाळकर – शहरातील वाहतुकीला कडक शिस्तीची गरज
करमाळा समाचार
गेली काही वर्षांपासून करमाळा शहरात वाहतुकीची नियमावली पोलिस प्रशासनाणे ठरवून दिली होती. शहरातील मेंन रोडवर पार्किंग चे सम विषम तारखेचें फलक हि लावले होते. एकेरी वाहतुकीचे हि फलक लावण्यात आले होते. काही महिने याची कडक आंलबजावणी पण झाली. नियम मोडणार्यांना दंडात्मक कार्यवाही हि करण्यात आली मात्र बेशिस्त वाहन चालक याना पाहिजे तो लगाम बसलेला नाही.

शहरात रस्त्यावर कुठेही वाहन पार्किंग करून लोक बिनधास्त फिरतात, विशेष करून शहरातील मेंन रोड वर तर प्रचंड प्रमाणात टू व्हीलर आडव्या तिडव्या पार्क केलेल्या असतात अगोदरच अरुंद रस्ते मेन बाजारपेठ असल्याने वाहनांची गर्दी यामुळं लोकांना पायी चालणे पण अवघड होते. मेंन रोडवरील बँक, मोठे हॉस्पिटल या समोर तर पार्किंग चे नियम न पाळता जागा मिळेल तिथे पार्किंग गाड्या पार्क करतात त्यातच व्यापार पेठ असल्याने किराणा मालाचे मोठी दुकान , व त्यांना माल घेऊन येणारे मोठे ट्रक, टेंपो हे रस्त्यात च उभे केली जातात.
त्यामुळे तास न तास रस्ते जाम असतात , फेरीवाले , स्टॉल वाले यांच्यामुळे पण पादचार्यांना अडथळा निर्माण होतो. मेंन रोडवरील दुकानादार बँका, हॉस्पिटल वाले यांनी ही नागरिकांना गाडी पार्किंग चे नियम सांगायला हवेत. करमाळा बसस्थानकात भव्य पार्किंग व्यवस्था असून बाहेरून येणाऱ्या वाहन चालकांनी आपापली वाहन तिथे पार्क करायला हवीत. जर करमाळा नगर परिषद व पोलीस प्रशासनाने संयुक्त कार्यवाही केल्यास नक्कीच करमाळा शहरातील वाहतूक कोंडी सुटेल व नागरिकांना हि दिलासा मिळेल अशी अपेक्षा सुप्रसिद्ध गायक प्रविण अवचर यांनी व्यक्त केली.
