करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय फुटबॉल संघ जिल्हास्तरीय उपविजेता

करमाळा समाचार

येथील विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा या महाविद्यालयाच्या 19 वर्षे वयोगटातील मुले व मुली फुटबॉल संघाने सोलापूर जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये उपविजेते पद मिळविले आहे . या स्पर्धा आयोजन क्रीडा व युवक सेवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद आणि सिंहगड पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ११ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर रोजी फुटबॉल स्पर्धा या सिंहगड पब्लिक स्कूल केगाव या ठिकाणी चालू आहेत. १९ वर्ष वयोगट मुले या स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाने स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला.

यात यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा या फुटबॉल मुलांच्या संघाने कै.विठ्ठलरावजी शिंदे ज्युनिअर कॉलेज, अंबाड या संघाचा २-० तर उपांत्य फेरीमध्ये एम. आय. टी. पंढरपूर या संघाचा १-० ने पराभव करत अंतिम फेरी गाठून जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये उपविजयी संघ ठरला.
तसेच 19 वर्षे वयोगट मुलीमध्ये कै. विठ्ठल रावजी शिंदे ज्युनिअर कॉलेज,अंबड या महाविद्यालयाचा १-० ने पराभव करत अंतिम फेरी गाठून मुलींचा संघही उपविजयी झाला.या विद्यार्थ्यांना उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक , करमाळा तालुका क्रीडा समन्वयक,शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.राम काळे , प्रा. दीपक ठोसर, प्रा.सौ.संध्या बिले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड,संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ.अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक , कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE