करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळ्यातील सभेत व्यासपीठावर उपस्थित नेत्याला कारवाईचा आला फोन ; सभा अर्धवट सोडुन नेता रवाना

करमाळा समाचार

करमाळ्यात आज माजी आमदार नारायण पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेशासह धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फुटला. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह विविध भागातील नेते उपस्थित होते. दरम्यान या सभेला पंढरपूरचे नेते अभिजीत पाटील हे ही आले होते. परंतु सभेच्या मधूनच निघून जावे लागले. यावेळी त्यांना एक कॉल आला व त्यांनी लागलीच पंढरपूरचा रस्ता धरला होता. त्याचं कारण ही आता स्पष्ट झाला आहे.

अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर राज्य सहकारी बँकेने कारवाई करत थकीत बिलापोटी कारखान्यावर कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. तर लोकसभा निवडणुकीत पाटील यांचा माढा मतदारसंघात असलेला प्रभाव व त्यासाठी त्यांची सुरू असलेली धावपळ ही थांबवण्यासाठी सदरची कारवाई करण्यात आल्याचे आरोप केले जात आहेत.

तर सदर सभेमध्ये उपस्थित असल्यानंतर पाटील यांना या संदर्भात एक फोन आला होता. त्यानंतर त्यांनी ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्याकडे परवानगी मागून त्या ठिकाणाहून सभा अर्धवट ठेवूनच निघून जाणे पसंत केले. तर सभेदरम्यानही कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी माळशिरसचे नेते उत्तम जानकर आणि पंढरपूरचे नेते अभिजीत पाटील यांच्यावर कारवाई करण्याची भीती दाखवली जात आहे असे वक्तव्य केले होते. सभा संपण्यापूर्वीच सदरची कारवाई झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE