एकरकमी एफ आर पी बाबत मोठी घोषणा ; महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाला लेखी आश्वासन
करमाळा समाचार
दिल्ली येथील कृषीभवनामध्ये केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या दालनात महाराष्ट्रातील शिष्टमंडळासह ऊस FRP संदर्भात महत्वपूर्ण बैठक झाली. ऊसाची FRP एकरकमी देण्याचे लेखी आश्वासन मा. पियुष गोयलजी यांनी दिले आहे.

केंद्राशी संपर्क ठेवून ही बैठक तात्काळ घडवून आणल्याबद्दल आणि सकारात्मक चर्चा झाल्याबद्दल माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रकांतदादा पाटील यांचे मनापासून आभार. या बैठक प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष वासुदेव काळे, माजी मंत्री सदाभाऊ खोत, खा. उन्मेष पाटील, खा. अनिल मेंढे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्यात काही संघटना जाणीवपूर्वक केंद्र सरकार ऊसाच्या एफआरपीचे तीन तुकडे करणार असल्याचे गैरसमज निर्माण करत आहेत. आम्ही ऊसाच्या एफआरपीचे तुकडे करणार नाही आणि तसा कोणताच प्रस्ताव विचाराधीन नाही असे मा.गोयल यांनी स्पष्ट केले.
शुगर केन ऑर्डर ऍक्ट १९६६ नुसार शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला गेल्यावर १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागतील. केंद्र सरकार एफआरपीमध्ये कोणताही बदल करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
एकरकमी एफ आर पी दिल्याबद्दल करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने केंद्रीय मंत्री पियुष गोयल जी यांचे आभार मानतो असे भाजपा करमाळा तालुका सरचिटणीस अमरजित साळुंके यांनी म्हटले आहे. भाजपा चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी एकरकमी एफआरपी साठी केलेल्या विविध प्रकारच्या आंदोलनाला यश आले, त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन.