करमाळासोलापूर जिल्हा

हाकेच्या अंतरावर झाडावर पडली वीज ; रहिवासी भागात पडल्याने बघणारांची उडाली भंबेरी

करमाळा समाचार 

बुधवारी करमाळा शहरात मुसळधार पाऊस सुरू होता. अचानक दोन ते तीन वेळा विजेचा जोरदार कडकडाट सुरू झाल्याचा आवाज आला. परंतु नेमकी विज कुठे पडली हे कुणाला कळत नव्हते. परंतु करमाळा शहरातील वेशीपासून काही अंतरावरच वीज पडली असून त्या ठिकाणी एक झाड पूर्ण चिरल्याचे चित्र दिसून आले. तर काही अंतरावर इतर घरे असल्याने त्या सर्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

अनेकदा विजांचा कडकडाट ऐकायला येतो. परंतु या या वेळेचा कडकडाट हा साधारण नव्हता. अतिशय मोठ्या प्रमाणात वीज पडल्याने सर्वांचे लक्ष वेधले होते. व लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वत्र भयभीत झाले होते. नेमकी विज कुठे पडली हे कुणाच्या लक्षात येत नव्हते. अशा परिस्थितीत सर्वजण घरातच बसले होते. बाहेर पडव्यावर वीज कुठून कुठे पडेल हे न सांगता येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर आवाज कधीच आला नव्हता. पण आज बुधवारी झालेल्या पावसात हा मोठा आवाज आला होता.

*करमाळ्याच्या कमालाई मातेवर आधारीत गाण्याचे मंदीर परिसरात प्रकाशन ; प्रकाशनाचा मान महिलांचा*
https://karmalasamachar.com/publication-of-temple-based-songs-based-on-karmalyas-kamalai-mata-publishing-neck-of-women/

पाउस मुसळधार झाल्यानंतर थोडासा विश्रांती घेतली. यावेळी एकामेकांना फोन झाले. या दरम्यान लक्षात आले की कुंभारवाडा परिसरात तबरेज सय्यद यांच्या घरासमोर असलेल्या एका बाभळीच्या झाडावर वीज पडलेली आहे. त्या विजेचा आवाज व धमाका एवढा जोरदार होता की त्या झाडाचे तुकडे तुकडे रस्त्यावरून पडले होते. शिवाय त्या परिसरात एका महिलेने व मुलाने वीज पडताना डोळ्याने पाहिले. शेजारच्या झाडा शेजारी म्हैस बांधलेली होती. जवळपास पंधरा मिनिट त्या म्हशीला सुद्धा काय कळाल नाही की काय झाले. एवढा मोठा उजेड आणि धमाका त्या ठिकाणी ऐकू आला होता. सय्यद कुटुंबात तसेच इतर शेजारीपाजारी मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

*घरबसल्या दर्शन* … video …

*भक्तीमय वातावरणात कमलाभवानी मातेचे दर्शन ; मंदीरे उघडल्याने भक्त उत्साही*

त्या ठिकाणी वीज कडकडाट झाल्यानंतर परिसरातील परदेशी यांच्या घरातील एक टीव्ही चालू होता. त्यात तो टीव्ही त्यावेळी पासून बंद पडला तो पुन्हा चालू झाला नाही त्यामुळे वीज कडाडल्या नंतर त्याचा प्रभाव टीव्हीवर व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू वर पडू शकतो. त्यामुळे विजेचा कडकडाट असताना घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवलेली फायद्याचे ठरेल.

 

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE