शिंदे गटाला मोठा धक्का ; पुर्व भागातील नेत्याचा शिंदे गटाला रामराम
समाचार टीम
करमाळा तालुक्याच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. मागील अनेक दिवसांपासून या गावचा किंवा या गटाचा नेता लोक शिंदे गटात एका मागोमाग प्रवेश करताना दिसून येत होते. पण आता शिंदे गटाला मोठा झटका बसला आहे. पूर्व भागातील साडे गावचे माजी सरपंच तथा पंचायत समिती सदस्य जया ताई जाधव यांचे पती दत्तात्रय जाधव हे आता शिंदे गटाला राम राम ठोकण्याच्या तयारीत आहे.

माजी आमदार नारायण पाटील यांच्या गटात मोठी भूमिका पार पाडणारे दत्तात्रय जाधव हे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे हे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांच्या जवळीक मध्ये आले होते. संजयमामा यांच्या संपर्कात आल्यानंतर जाधव यांनी पाटील यांच्यासोबत फारकत घेऊन शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर पूर्व भागातून मताधिक्य मिळवून देण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. स्वबळावर राजकीय कारकीर्द घडवणारा हा नेता आज पुन्हा एकदा एक नव्या दिशेने जाताना दिसत आहे.

दत्तात्रय जाधव यांनी नुकतेच आपण शिंदे गट सोडून बाहेर पडत असल्याचे घोषणा केली आहे. या संदर्भात त्यांनी बोलत असताना अधिक माहिती देण्याचे टाळले असले तरी लवकरच आपण पत्रकार परिषदेत या संदर्भात घोषणा करू अशी माहिती यावेळी दिले आहे. जाधव यांच्या जाण्यामुळे शिंदे गटाला मोठे नुकसान असल्याने शिंदे गट यात आता कोणती भूमिका घेतोय याकडे लक्ष लागून राहिले आहे.
नाराजीचे कारण गुलदस्त्यात..
दत्तात्रय जाधव यांच्या गावात व गटात त्यांचा चांगला प्रभाव आहे. त्यांच्या गावची मतदार त्यांना आपला नेता मानतात. अशा प्रकारचा एक नेता गटातून बाजूला जाणे म्हणजे मोठा धक्काच मानला जात आहे. पण दत्तात्रय जाधव अचानक अशा पद्धतीने का गेलेत याबाबत अद्याप कसलेही स्पष्टीकरण त्यांच्याकडून देण्यात आले नाही. त्यामुळे आजही त्यांच्या नाराजीचे कारण हे गुलदस्त्यात राहणार आहे.