टाळूवरचे लोणी खाण्याचं पाप भाजप सोशल मिडिया व नेते मंडळी यांनी करू नये
प्रतिनिधी – करमाळा
सोशल मिडिया मध्ये भाजप कार्यकर्त्यांनी संजयमामा व भाजपा उमेदवार यांचा जुना फोटो फिरवून मतदारांचा गैरसमज करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावरुन संजयमामा चांगलेच भडकले असुन मी आयुष्यात कधीच गद्दारी केली नाही व करणार नाही, जे करतो ते समोरा समोर करतो, कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसून स्वताच्या राजकारणाची पोळी भाजण्याचं भिकार राजकारण मी करीत नाही असे संजयमामांनी स्पष्ट केले आहे.

पुढे बोलताना संजयमामा म्हणाले, भगीरथ दादा भालके हे माझ्या मित्राचा स्व.भारतनानांचा मुलगा आहे. नाना आज हयात नाहीत, गैरसमज पसरवून त्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचं पाप भाजप सोशल मिडिया व नेते मंडळी यांनी करू नये.

तुम्ही कितीही खालच्या हिन पातळीवर गेलात तरी राष्ट्रवादी कॉग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री भगीरथ दादा भालके चांगल्या मतांनी विजयी होतील. सर्व कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.