करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

बेफिकीर पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडील पालक मंत्री पदाची जबाबदारी काढून घ्यावी शिवसैनिकांची मागणी

करमाळा प्रतिनिधी सुनील भोसले

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच सोलापूर जिल्ह्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असून सोलापूर जिल्ह्यात कोरोना चे संकट वाढत असताना त्यांची जिल्ह्यात कुठेही लक्ष नाही. त्यांचा शासकीय अधिकारी पदाधिकारी व सर्वसामान्य जनतेशी कसलाही संपर्क नाही अशा बेफिकीर पालकमंत्र्यांकडे सोलापूर जिल्ह्यातील पालक मंत्रीची जबाबदारी काढून घेऊन ती दुसऱ्या एका सक्षम मंत्र्याकडे द्यावी अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे प्रचंड संकट आहे अनेक जणांचे औषधे ऑक्सीजन वेळ मिळत नाही. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यासाठी जागा मिळत नाही. यामुळे अनेकांचे दुर्दैवी मृत्यू होत आहेत. यासंदर्भात पालकमंत्री यांनी अद्याप एकही बैठक घेतली नाही.

करमाळा तालुक्यात सध्या फक्त पस्तीस बेड उपलब्ध असून या ठिकाणी शासनाने कुठले प्रकारचा ऑक्सिजन उपलब्ध करून दिलेला नाही. रेमडीसिव्हर औषधासाठी रुग्णांचे प्राण जात आहेत. जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी वारंवार फोनवरून संपर्क केला असता औषधांची मागणी केली असता पाहिजे तेवढा सपोर्ट मिळत नाही.

रेमडीसिव्हर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी नेमलेल्या कमिटीचे सदस्य फोन उचलत नाही. लॉकडाऊन ची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनावर दत्ता मामा भरणे यांचा कोणताही वचक राहिलेला नाही. एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे जीवाची बाजी लावून महाराष्ट्र वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे सत्तेचे पांघरून घेतलेले पालकमंत्री मात्र आपले कर्तव्याला विसरत आहेत.

कोणत्या तालुक्याला किती औषध दिली याची माहिती प्रसिद्ध केली जात नाही. अनेक ठिकाणी लसीकरण बंद आहे. एकटा करमाळा तालुक्यात गेली चार दिवसापासून 40 ते 50 रुग्णांना औषधाची गरज आहे. वारंवार तालुका वैद्यकीय अधिकारी संबंधित आपात्कालीन व्यवस्थेला संपर्क साधला असता एकमेकांकडे बोटे दाखवली जातात. अशा परिस्थितीत पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांनी प्रत्येक प्रत्येक तालुक्यात जाऊन आढावा बैठक घेऊन परिस्थितीची माहिती घेऊन उपाययोजना करणे गरजेचे होते. अद्यापपर्यंत एका महिन्याच्या काळात राष्ट्रवादी वाढवण्याच्या कामासाठी फिरत आहेत मात्र कोरोना च्या लढाईत उतरत नाहीत.

ते महाराष्ट्र राज्याच्या जनतेचे मंत्री आहेत त्याचा त्यांना विसर पडला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे आहेत याचा सुध्दा विसर पडला आहे. आता टीकाटिप्पणी करण्यापेक्षा उद्धव साहेबांनी तातडीने या अकार्यक्षम सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री कडील सोलापूर जिल्ह्याचा कारभार काढून एक सक्षम पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याला द्यावा अशी मागणी शेकडो सैनिकांनी शिवसैनिकांनी सह्या निशी केली आहे.

जेणेकरून करूनच या संकटावर मात करण्यासाठी सर्वसामान्यांना सर्व पदाधिकारी अधिकारी व्यापारी कर्मचारी यांचा समन्वय ठेवून वारंवार बैठका घेऊन अडचणीवर मात करण्यासाठी प्रयत्न करणारा सक्षम पालकमंत्री मिळाला तर सोलापूर जिल्हा कोरणा तून बाहेर पडेल अन्यथा अजून परिस्थिती आटोक्याबाहेर जाईल. याबाबत शिवसेनेचे जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, शिवसेनेच्या अनेक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य पदाधिकाऱ्यांनी वारंवार आरोग्यविषयक अनेक मागण्या केल्या मात्र याकडे कसलीही लक्ष देण्यात आले नाही.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE