पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोगावात रक्तदान शिबीर
करमाळा समाचार
ग्रामपंचायत सोगाव व भगवत ब्लड बँक, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रिय कृषिमंत्री , जाणता राजा मा. ना श्री.शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबीर दिनांक 14/12/2021 रोजी ग्रामपंचायत सोगाव येथे पार पडले.

आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 81 जणांनी रक्तदान करून आपले कर्तव्य पार पाडले. त्यामध्ये 11 महिला व 70 पुरुषांनी रक्तदान केले. यासाठी ग्रामस्थ सोगाव यांचे सहकार्य लाभले.

तसेच श्री. भगवंत रक्तपेढी बार्शीचे जनसंपर्क अधिकारी गणेश जगदाळे, तृप्ती जाधव, श्रावणी होनमाने, राधिका बेले,सुयश शेळवणे यांनी यशस्वीरीत्या रक्तसंकलन केले. त्याबद्दल सरपंच स्वप्नील सोमनाथ गोडगे यांनी ग्रामस्थ सोगाव व श्री. भगवंत ब्लड बँकेचे आभार मानले…