कमलाभवानी साखर कारखान्यावर रक्तदान शिबिर संपन्न
करमाळा समाचार -संजय साखरे
तालुक्यातील पांडे येथील कमलाभवानी साखर कारखान्यावर आज माढा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बबनदादा शिंदे यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात १६० रक्तदात्यांनी रक्तदान केले.माढा तालुका पंचायत समितीचे सभापती व कमलाभवानी शुगर कारखान्याचे संस्थापक मा. विक्रम सिंह शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन युवक नेते सुनील बापू सावंत व मांगी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सुजित तात्या बागल यांच्या हस्ते करण्यात आले .यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी , वाहन मालक व कर्मचारी यांनी रक्तदान केले. सोलापूर येथील डॉ.वंशपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री छत्रपती शिवाजी शासकीय सर्वोपचार रुग्णालय यांच्या वतीने रक्त संकलित करण्याचे काम करण्यात आले.

यावेळी सरपंच समाधान भोगे ,कारखान्याचे एम डी श्री. डांगे साहेब ,जनरल मॅनेजर सवाळे साहेब, कॅन मॅनेजर रोकडे साहेब, शेती अधिकारी जगदाळे साहेब, चिप केमिस्ट कदम साहेब ,चीफ इंजिनिअर गायकवाड साहेब, प्रशासनाधिकारी जगताप साहेब, कामगार अधिकारी बागल साहेब यांच्यासह कारखान्याचे कर्मचारी उपस्थित होते.