करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा शहरात धाडसी चोरी ; चोर सीसीटीव्हीत कैद

समाचार टीम

करमाळा शहरापासून काही अंतरावर असलेल्या बागवान नगर येथे चोरट्यांनी धाडसी चोरी केली आहे. परिसरात एक मोटरसायकल सह दोन ठिकाणी चोरी करून चोर पसार झाले आहेत. या ठिकाणी असलेल्या बागवान किराणा या दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश परत एक चोरी केली आहे. तर एका भाडेकऱ्याची मोटरसायकल चोरून नेली आहे. सदरची चोरी ३१ रोजी पहाटेच्या वेळी झाली आहे.

करमाळा शहरापासून काही अंतरावर असलेल्या बागवान नगर परिसरात ही दुसऱ्यांदा चोरीची घटना घडली आहे. या परिसरात यावेळी चोरी करताना तीन ते चार चोर असावे असा अंदाज आहे. तीन चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटुन आत प्रवेश केला. यावेळी तीनही चोर सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे.

आत प्रवेश करून त्यांनी दुकानाच्या गल्ल्यातील जवळपास सहा ते सात हजार रुपये व काजू बदाम सारखे महागड्या वस्तू या दुकानातून चोरी करून गेले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने चोरी झाली होती. त्या चोट्याचा अद्याप तपास लागलेला नसल्याने अशा प्रकारच्या चोऱ्या करण्यात चोरट्यांचे धाडस वाढताना दिसून येत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE