राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या वतीने बार्शीत रक्तदान शिबिर संपन्न
बार्शी प्रतिनिधी –
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात रक्ताची कमतरता भासत आहे.याचे गांभीर्य ओळखून राष्ट्रवादी पदवीधर संघाचे अध्यक्ष सुनीलदादा पटील,राष्ट्रवादी पक्ष व फ्रंटल संघटनांचे समन्वयक सुहासभाऊ उभे यांच्या आदेशाने राज्यातील 33 जिल्ह्यात रक्तदान महाभियान राबवण्यात आले.याचाच भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील श्रीमान रामभाई शहा रक्तपेढीमध्ये रक्तदानाचा कार्यक्रम पार पाडला.या रक्तदान शिबिराचे उदघाटन राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य मा.नितीनभाऊ झिंजाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विक्रमजी सावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.


या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादी पदवीधर संघाचे जिल्हाध्यक्ष मा.वैभव साळुंखे,जिल्हा उपाध्यक्ष मा.आतिश गायकवाड,जिल्हा कार्याध्यक्ष मा.विक्रांत पाटील यांनी केले. यावेळी २७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मा.मंगेशजी चव्हाण, तालुका कार्याध्यक्ष मा.जयंतजी देशमुख, मा.सागर गायकवाड, तालुका अध्यक्ष मा.शरद पाटील,शहर अध्यक्ष मा.सोमनाथ गोसावी, माढा तालुकाध्यक्ष मा.संदीप गोरे, करमाळा तालुकाध्यक्ष मा.रवींद्र वळेकर, वैभव माने यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थितीत होते.
राज्यात सध्या कोरोनापेक्षा जास्त मृत्यू रक्ताच्या कमतरतेमुळे होत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही राज्यभर रक्तदान महाभियान राबवत आहोत. यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचणार आहेत म्हणून समाजातील जागृत लोकांनी रक्तदानासाठी पुढं आल पाहिजेत.
–नितीन झिंजाडे,
प्रदेश सदस्य,राष्ट्रवादी पदवीधर संघ