शेतातील शुल्लक कारणातुन भावासह भावजयला मारहाण ; गुन्हा दाखल
करमाळा समाचार
शेतीतील सामाईक पाईपलाईनला पाईप जोडल्याच्या कारणावरून मोठ्या भावाने लहान भावाला मारहाण करून गंभीर जखमी केले तर पत्नीलाही मारहाण केली आहे. याप्रकरणी मोठ्या भावासह चार जणांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार १४ जून रोजी रात्री आठच्या सुमारास हिसरे ता. करमाळा येथे घडला आहे

जयद्रथ बाबा हजारे, लक्ष्मीबाई हजारे, नामदेव हजारे, बानुबाई हजारे सर्व रा. हिसरे ता. करमाळा यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सुग्रीव बाबा हजारे (वय ५९) यांनी तक्रार दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जयद्रथ व सुग्रीव यांची हिसरे येथे जमीन आहे. त्या दोघांमध्ये सामायिक पाईपलाईन केली आहे. १२ जून रोजी या दोन्ही भावांना मध्ये सामायिक पाईपलाईनला पाईप जोडल्याच्या कारणावरून किरकोळ वाद झाला होता. तो वाद नंतर आपसात मिटून घेतला. पण त्यातून ते सुग्रीव यांच्यावर चिडून होते. त्यानंतर १४ जून रोजी रात्री आठ वाजता सुग्रीव हे पत्नीसोबत घराबाहेर बसलेले असताना भाऊ, भाऊजय, पुतण्या व सून त्या ठिकाणी आले व मोठ्याने शिवीगाळ करू लागले.
यावेळी जयद्रथ यांनी हातातील गजाने सुग्रीव व त्यांच्या पत्नीला मारहाण करू लागले व धमकी दिली. यावेळी पुतण्याने ही दगडाने पाठीवर मारून जखमी केले. तर लक्ष्मीबाई यांनी बायको रसिकाला मारहाण केली. जखमी झाल्यानंतर सर्व त्या ठिकाणाहून निघून गेले. स्थानिकांनी सुग्रीव व पत्नीला दवाखान्यात दाखल केले. यानंतर करमाळा पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने हे करीत आहे.