करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी देवकते; तर उपाध्यक्षपदी जाधव

करमाळा समाचार

करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी आदिनाथ देवकते तर व्हाईस चेअरमनपदी तात्यासाहेब जाधव व सचिवपदी अजित कणसे यांची अविरोध निवड करण्यात आली. ही निवड निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे यांच्या अध्यक्षतेखाली पतसंस्थेच्या कार्यालयात पार पाडण्यात आली.

या निवडणुकीत स्वाभिमानी शिक्षक पॅनलचे दहा उमेदवार विजयी झाले होते. निवडणुकीत एकूण 585 मतदारांपैकी 579 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये सर्वसाधारण गटातून प्रताप काळे,अरुण चौगुले,निशांत खारगे, तात्यासाहेब जाधव व अजित कणसे हे उमेदवार विजयी झाले होते तर गुरुसेवा पॅनलचे हनुमंत सरडे हे एकमेव उमेदवार विजयी झाले होते. तसेच अनुसूचित जाती गटातून सतीश चिंदे, इतर मागास प्रतिनिधी गटातून साईनाथ देवकर तर भटक्या जाती जमाती गटातून आदिनाथ देवकते तसेच महिला प्रतिनिधी गटातून वैशाली महाजन व पूनम जाधव हे उमेदवार विजयी झाले होते.

त्यामुळे आता पतसंस्थेत स्वाभिमानी शिक्षक पॅनलचे चेअरमन व व्हा. चेअरमन तसेच सचिव झाले आहेत. गेल्या पंचवार्षिकमध्ये देखील स्वाभिमानी शिक्षक पॅनलचीच सत्ता सोसायटीमध्ये होती.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE