बफर स्टॉक युरीया वाटप सुरु पण साठा वाढवण्याची गरज
करमाळा समाचार
बफर स्टॉक मधील यूरिया प्रत्येक शेतकऱ्याला दोन पोते दिला जात असून या योजनेचा फायदा शेतकर्यांनी घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक महेंद्र होटकर यांनी केले.

बफर स्टॉक मधील युरीया वाटपाचा शुभारंभ तहसीलदार समीर माने, तालुका कृषी अधिकारी देवराव जाधव, कृषी उद्योग चे विक्री व्यवस्थापक एस एस पाटील, पंचायत समितीचे कृषी अधिकारी कैलास मिरगणे, सुजित बागल आदी जण उपस्थित होते. यावेळी बोलताना तहसीलदार समीर माने म्हणाले की, करमाळा तालुक्यातील सिंचन क्षमता वाढली आहे. त्या प्रमाणात रासायनिक खत पुरवठा व्हावा यासाठी आमचे जिल्हा पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

महेश ऍग्रो एजन्सी चे महेश चिवटे म्हणाले की, बफर स्टॉक योजनेतील ५० टन युरिया आमच्याकडे उपलब्ध झाला आहे. प्रत्येक शेतकऱ्याला दोन पोते आधार कार्ड नुसार देण्यास सुरुवात करण्यात आली. पण उपलब्ध झालेली ५० टन कॉन्टिटी अत्यंत थोडी आहे. दोन दिवस सुद्धा हि पुरणार नाही. त्यासाठी जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने यांच्याकडे जास्तीत जास्त युरिया मिळावा यासाठी मागणी नोंदविण्यात आली आहे.
कृषी विकास अधिकारी शंकर मिरगणे यांनी छापील किमतीपेक्षा जास्त दर घेणाऱ्या कृषी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करू असा इशारा दिला शेतकऱ्यांनीही युरियाचा वापर कमी करून एनपीके खताचा वापर करावा असे आवाहन केले. प्रत्येक शेतकऱ्याला विदाऊट लिंकिंग दोन पोते युरिया मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी युरिया मिळवण्यासाठी मोठी गर्दी केली होती.