करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

आगामी निवडणुकीत आमच्या गटातुन आबांना सर्वाधिक मताधिक्य

करमाळा समाचार

आगामी विधानसभा निवडणुकीत आपण नारायण पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण पाटील यांना केम जिल्हा परिषद गटातून सर्वाधिक मताधिक्य देऊ अशी खात्री माजी जिल्हा परिषद सदस्य व मोहिते पाटील गटाचे नेते दिलीपदादा तळेकर यांनी बोलून दाखवली.

आळसुंदे येथे जलजीवन योजना तसेच ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगातील कामांचे उद्घाटन व लोकार्पण तालुक्यातील मोहिते-पाटील गटाचे आधारस्तंभ दिलीपदादा तळेकर व माजी आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जि प अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, सभापती अतूल पाटील, माजी सभापती शेखर गाडे, उपसभापती दत्तात्रय सरडे, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा अर्जून सरक, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य नसरुल्ला खान यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तर माजी आमदार पाटील म्हणाले, आगामी काळात पुर्व भागातील एक गुंठाभर क्षेत्र सुध्दा ओलीतापासून वंचीत राहणार नाही, संपुर्ण पुर्व भाग बागायत क्षेत्र म्हणून ओळखला जाईल. करमाळा मतदार संघातील विकासकामे ठप्प पडली आहेत. दहिगाव उपसा सारख्या सिंचन योजना पुर्ण क्षमतेने चालत नाहीत. याचा फटका शेतीवर होत आहे. आगामी काळात जनतेने आशीर्वाद दिले तर करमाळा तालुक्यातील पुर्व भागातील एक गुंठा क्षेत्रही ओलीतापासून वंचित राहणार नाही.

वीज, पाणी, दळणवळण समस्या वाढत असून सत्ता नसतानाही आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पाठपुरावा करुन मतदार संघातील प्रश्न घेऊन जात आहे. मतदार संघातील विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. जलजीवन योजनेच्या माध्यमातून गावे पाण्यासाठी स्वावलंबी होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘हर गाव जल, हर घर नल’ हि संकल्पना पुर्ण होताना दिसून येत आहे. आळसुंदे ग्रामपंचायतीच्या सरपंच सोमनाथ देवकाते व त्यांच्या सर्व सहकारी विकासाला प्राधान्य देऊन सतत दक्ष राहून काम करतात याचे फलीत आजच्या दिड कोटींच्या विकासकामातुन दिसून येत असल्याचे सांगून त्यांनी गावकरी व ग्रामपंचायत यांनी असेच चांगली ग्रामसुधारणेची कामे करावीत, आपला या गावास सदैव पाठींबा व सहकार्य असल्याचे अभिवचन यावेळी पाटील यांनी दिले.

प्रास्तविक पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केले. यावेळी सरपंच सोमनाथ देवकाते, आबासाहेब अंबारे, प्रा अर्जून सरक, उपसभापती दत्तात्रय सरडे, जि प अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनीही विचार मांडले. या कार्यक्रमाला पुर्व भागातील सरपंच दादासाहेब भांडवलकर (वरकुटे), सरपंच शीतलकुमार मोटे (पाथुर्डी), उपसरपंच संतोष सोनवर (आवाटी), माजी सरपंच पोपटबप्पा पाटील (नेरले),मोतीराम घाडगे, माजी सरपंच दादासाहेब बंडगर (आवाटी), राजू खान (आवाटी). सतीश रुपनर,माजी उपसरपंच गोकूळ पाटील (सालसे),श्री भोसले सरपंच(केम), चंदुनाना अंबारे, सरपंच सागर पोरे (कुगाव), इन्नुसभाई शेख (कुगाव) नवनाथ अवघडे, महेश पाटील, यशवंत सुळ, शिवाजी गवळी, यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच व ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्य यांनी पुढाकार घेतला. उपस्थितांचे आभार उपसरपंच नागनाथ सरवदे यांनी मानले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE