पतसंस्था आणी दोन दुकाने फोडुन चोरी ; अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल
करमाळा समाचार
पथसंस्थेसह दोन दुकानांचा पत्रा उचकटुन अनोळखी चोरट्याने चोरी केल्याचा प्रकार दि ३० रोजी रात्री पारेवाडी स्टेश्न केत्तुर क्रमांक दोन येथे घडला आहे. यावेळी २९ हजारांचा मुद्देमाल चोरीस गेल्याबाबत कापड दुकान चालकाने तक्रार दिली आहे.

याबाबत अधिक माहीती अशी की, पारेवाडी स्टेशन केत्तुर क्रमांक दोन येथे कमलाई कापड दुकान व फाळके हार्डवेअर दुकान आहे. तर समोरच्या बाजुला किर्तेश्वर ग्रामीण बिगरशेती पथसंस्था आहे. दि ३० रोजी नवनाथ विनायक फाळके (वय ३८) व त्यांचे बंधु दुकान बंद करुन घरी गेले होते. यावेळी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने दोन्ही दुकानांचा पत्रा उचकटुन आत प्रवेश केला व कमलाई कापड दुकानातील ५ हजाराच्या १० पॅन्ट, तीन हजार रुपयाचे सी सी टिव्ही कॅमेराचे डिव्हीआर, हॉर्ड डिस्क, डोगल हे नेले.
तर फाळके हार्डवेअर मधील ८ हजार रुपयांचे तीन स्टाटर, चार मेगा असे इलेट्रिक सामान नेले तसेच शेजारी असलेल्या किर्तेश्वर पथसंस्थेमधुन रोख १३ हजार रक्कम चोरुन नेला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास हवालदार श्रीकांत हराळे करीत आहेत.
