एस टी अपघात प्रकरणात चालकावर गुन्हा दाखल ; खराब गाड्यांमुळे अपघात चालकाचा दोष काय ? लोकांचा प्रश्न
करमाळा समाचार
कर्जत तालुका कर्जत येथून करमाळ्याच्या दिशेने येत असताना सकाळी रावगाव येथे एसटीमध्ये बिघाड झाल्यामुळे चालकाचा ताबा सुटुन सदर गाडीचा अपघात घडला आहे. सदरची गाडी ही रस्त्याखाली उतरून चारीत जाऊन पडल्याने गाडीतील ३८ प्रवासी जखमी झाले आहेत. सदरची घटना मंगळवारी दि ३१ सकाळी अकराच्या सुमारास रावगाव परिसरात घडली आहे. यातील जखमींना करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात जबाबदार म्हणून चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण खराब गाड्या चालकांना देऊन त्यांना दोष देणे कितपत योग्य आहे असा सवाल विचारला जात आहे.
मोठ्या प्रमाणावर खराब गाड्या करमाळा आगारात असून मागील काही दिवसांपूर्वी सहलीसाठी गेलेल्या गाड्यांमध्ये मध्ये बिघाड आल्यामुळे शाळेने सुद्धा सदरच्या गाड्या बाबत नाराजी व्यक्त केली होती. तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने यापुढे एसटी बस या सहलीसाठी देऊ नये अशी मागणी शिक्षक वर्गाने केली आहे. दरम्यान आज सकाळी कर्जतकडे जात असतानाही सदर गाडीत बिघाड असल्याचे कळवण्यात आले होते. ती गाडी कर्जतला गेली व माघारी येत असताना रस्त्यामध्ये गाडीचा रॉड तुटल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.
त्यामुळे सदरच्या गाडीला अपघात झाला.
यावेळी गाडीच्या चालकाने प्रसंगावधान राखत गाडीचा वेग कमी केला त्यामुळे मोठा अपघात टळल्याचे गाडीतील प्रवाशांनी सांगितले आहे. तर गाडीला अपघात झाल्यानंतर रावगाव गावातील व परिसरातील लोकांनी गाडीत अडकलेल्या सर्व प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी तात्काळ १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहीकेला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु अखेरपर्यंत रुग्णवाहिकाचा संपर्क होऊ शकला नाही. अखेर उपजिल्हा रुग्णालयाबाहेर असलेल्या खासगी रुग्णवाहिकांमधून रुग्णांना करमाळा येथील रुग्णालयात पोहोच करण्यात आले. सदर गाडीमध्ये ३८ प्रवासी होते. त्यातील २३ प्रवाशांना करमाळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान सुधाकर महारुद्र ढेरे वय 80 वर्षे रा उपळाई ढोंगे ता बार्शी यांनी तक्रार दिल्यानंतर चालक मनोहर राजभाऊ खिलारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास करमाळा पोलिसांसह परिवहन मंडळाकडुन केला जात आहे. यामध्ये खरच चालक दोषी आहे का गाडीतील बिघाडामुळे अपघात झाला आहे हे समोर येईल पण ज्या पद्धतीने चालकावर गुन्हा दाखल झाला तसा खराब गाडी बाहेर पडण्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होईल का ? असा प्रश्न विचारला जात आहे.
जखमींची नावे …
अंबादास कांबळे (वय ८४) रा. खातगाव ता. करमाळा , सुधाकर ढेरे (वय८३) रा. उपळाई ता. बार्शी, मोहनसिंह परदेशी (वय ६७) रा. ऱजपुतमळा कर्जत, रघुनाथ नलवडे (वय ८३) रा. करमाळा, बायडाबाई शिंदे (वय ६७) रा. माळंगी ता. कर्जत , सविता जगताप (वय ३२) पंचवटी ता. माळशिरस , आदित्य जगताप (वय ९) रा. पंचवटी ता. माळशिरस , विमल मंडलीक (वय ५५) रा. माळंगी ता. कर्जत, नितीन पवार (वय २५) रा. जामखेड ता. अंबड, आबा वाघ (वय २५) रा. पाचोड ता. पैठण, कोंडाबाई चव्हाण (वय ६०) रा. वालवड ता. भुम , महादेव चव्हाण (वय ६५) रा. वालवड ता. भुम, अनिकेत जगताप (वय २८) रा. माळंगी ता. कर्जत , जयदिप जगताप (वय २३) रा. माळंगी ता. कर्जत, स्वाती कुंभार (वय ३५) रा. बिटरगाव ता. करमाळा, पायल कुंभार (वय १२) बिटरगाव ता. करमाळा , दशरथ ढेरे (वय ३५) रा. उपळाई, सुशीला ढेरे (वय ६०) रा. उपळाई ता. बार्शी, शहाबाई निकम (वय ७०) रा. वडगाव ता. करमाळा, विश्वनाथ निकम (वय ७४) रा. वडगाव, ता. करमाळा मंगल उकिर्डे (वय ४०) , संदिपान उकिर्डे (वय ५०), शंकर सुर्यवंशी (वय ७६) रा. ऱावणगाव ता. दौड असे जखमींची नावे आहेत.