करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

पालकांनी आपली अपुर्ण स्वप्ने मुलांवर लादु नये – प्रसिद्ध व्याख्याते शिंदे ; गुरुकुल येथे व्याख्यान व हळदीकुंकू समारंभ

करमाळा समाचार – नाना घोलप

केवळ मार्क मिळून उपयोग नाही.अभ्यासाचा आनंद घ्या, मज्जा घ्या. मोठी स्वप्न बघा राजकारण, समाजकारण, व्यापार, उद्योग ही असंख्य क्षेत्र आपल्यासाठी खुली आहेत असे सांगत असताना
पालकांनी स्वत:ची अपुर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलांवर कोणतीही गोष्ट लादु नये त्यांची कला बघून त्या कलेला वाव द्यावा अशी अपेक्षा प्रसिद्ध व्याख्याते व “राणी मला गाव सुटेना” कवितेचे लेखक गणेश शिंदे यांनी व्यक्त केली.

शनिवारी गुरुकुल पब्लिक स्कूल मध्ये विद्यार्थी महिलांना मार्गदर्शन पर सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महिलांचा हळदिकुंकु कार्यक्रमही आयोजीत केला होता. या कार्यक्रमास तब्बल ४०० महिलांसह १८०० पालकांनी उपस्थिती दर्शवली. यामध्ये विद्यार्थी, महिला व पुरुष वर्ग ही मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. गणेश शिंदे यांच्या उद्बोधन पर व्याख्यानाने सर्व विद्यार्थ्यां सोबत पालक वर्ग प्रेरित झाला. व्याख्यान सोबत शाळेमध्ये महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते.यावेळी कार्यक्रामाचे अध्यक्ष म्हणून गणेश करे व संसस्थेचे संस्थापक नितीन भोगे उपस्थीत होते.

भाग 2

स्पर्धेमध्ये एकूण ४०० महिलांनी सहभाग घेतला. या सर्व महिलांमध्ये अतिशय चुरशीचे, अटीतटीचे सामने झाले. अंतिम सामन्यापर्यंत महिलांमधून प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक काढून त्यांना शाळेकडून आकर्षक पारितोषिक व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात आल्या. नर्सरी ते दुसरी पर्यंतच्या पालकांचा एक गट व तिसरी ते दहावीपर्यंतच्या पालकांचा एक गट, नर्सरी ते दुसरी पर्यंत झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मान सौ. रूपाली लक्ष्मण सरोदे यांना मिळाला. पारितोषिक म्हणून सोन्याचे बदाम. द्वितीय क्रमांक सौ. प्रियांका गणेश बेडकुते पारितोषिक चांदीचा वाटी चमचा तर तृतीय क्रमांक सौ. मयुरी शैलेश गंधे पारितोषिक चांदीचा छल्ला व उत्तेजनार्थ क्रमांक कल्पना चंद्रकांत फुके यांना देण्यात आला. शाळेकडून त्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

तर दुसरी ते दहावीपर्यंतच्या गटामध्येही चार क्रमांक काढण्यात आले प्रथम क्रमांक महिला सौ आरती पराठे पारितोषिक सोन्याचे बदाम द्वितीय क्रमांक सौ. अनुराधा बर्डे पारितोषिक चांदीची वाटी व चमचा तृतीय क्रमांक सौ.योगेश्वरी दराडे पारितोषिक चांदीचा छल्ला उत्तेजनार्थ सौ प्रियांका पाटील पारितोषिक आकर्षक भेटवस्तू अशा प्रकारे शाळेकडून एकूण आठ महिलांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले अशाप्रकारे संस्थेचे संस्थापक नितीन भोगे व रेशमा भोगे यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE