करमाळाक्राईमताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटेंसह सात जणांवर करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

करमाळा समाचार


भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्यासह सात जणांवर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिवटे यांनी कोरोना बाधीत रुग्णाला जबरदस्तीने घरी घेऊन जाणे व संबंधित सरकारी डॉक्टरच्या कामकाजात अडथळा आणण्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. शैलेश प्रकाश देवकर वय 43 धंदा नोकरी राहणार किल्ला विभाग करमाळा यांनी फिर्याद दिली आहे.

गणेश चिवटे रा. राशिन पेठ करमाळा, खाजगी वाहन चालक शिवाजी क्षिरसागर (कुंभार ) रा.भवानी पेठ करमाळा, इतर पाच जण सर्व राहणार करंजे तालुका करमाळा. सदर प्रकार दिनांक 19/03/2021 रोजी सकाळी 04/30वा. सुमारास मौजे करमाळा येथील आंबेडकर covid- केयर सेंटर ता.करमाळा येथे घडला आहे.

यात हकिकत अशी की, चिवटे यांनी कोरोना केअर सेंटर येथे बेकायदेशीररित्या प्रत्यक्ष येऊन कोरोना रोगाची बाधा असताना सुद्धा सदर पाच पेशंटला होम कोरंटाईन करण्याचा आग्रह धरून सदर पेशंटला कोरंटाईन करण्यासाठी घरी घेऊन जाऊ द्या असे म्हणाले असता यातील फिर्यादी व कोविड सेंटर स्टाफ असे सर्वजण तुम्हाला सदर पेशंटला घरी घेऊन जाता येणार नाही असे म्हणाले असता चिवटे यांनी अनाधिकाराने सदर रुग्णांना तुम्ही घरी जावा बघू काय करतात ते पुढचे माझे मी पाहून घेतो असे म्हणत चालकाला पाच रुग्णांना घरी घेऊन जाण्यास सांगितले.

त्यानंतर लोकप्रतिनिधी कडुन अशी अपेक्षा नसल्याचे म्हणाल्यानंतर चिवटे हे डॉक्टरांच्या अंगावर धावून आले व दमदाटी करून म्हणाले मी मीडिया बोलावून तुमची बदनामी करून कोविड केअर सेंटर ची वाट लावतो असे म्हणत फिर्यादी काम करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणून जबरदस्तीने कोरणा बाधित रुग्णांना तुम्ही घरी चला असे म्हणत स्वतःचे वाहनात बसवून पाठवले आहे.

यावरुन त्या पाच जणासह भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे व चालकावर भादवि कलम 353, 269, 212,188,143, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51( ब ), साथीचे रोग अधिनियम 1897 कलम 2, 3, 4 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE