कत्तलीसाठी 19 जनावरे घेऊन जाताना पकडले ; दोघांवर गुन्हा दाखल
करमाळा समाचार
एक पांढरे रंगाचे पिकअप वाहन नंबर एम एच 45 टी 3226 मध्ये 04 काळया पांढ-या होस्टन गायी, 15 लहान होस्टन खोंड असे एकूण 19 जनावरे घेऊन जाताना पकडले आहे. सदरची कारवाई काल रात्री 00:45 वा. मौजे बोरगाव एस टी स्टॅन्डवर पासुन दिलमेश्वर रस्ताला करण्यात आली आहे. पोलिस मदतीसाठी 112 या क्रमांकावर संपर्क साधला त्यावेळी याप्रकरणी पोकॉ. आनंद भागवत पवार, करमाळा पोलीस यांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी फिर्याद पवार यांनी दिली आहे.

काल रात्री 00/45 वा. सुमारास मौजे बोरगाव एस टी स्टॅन्डवर बोरगाव ते दिलमेश्वर जाणारे डांबरी रस्त्यावर एक महिंद्रा कंपनीच्या पांढरे रंगाचे पिकअप चार चाकी वाहन नंबर एम एच 45 टी 3226 मध्ये 04 काळ्या पांढ-या रंगाच्या होस्टन गायी, 15 लहान होस्टन खोंड असे एकूण 19 गोवंश ही पिकअप चारचाकी वाहनामध्ये कोंबून बांधून त्यांना निर्देयतेने वागणूक देवून जनावरांची चारा पाण्याची सोय न करता तसेच त्यांना औषधाची सोय न करता केवळ कत्तली करीता घेवून जात असतांना मिळून आलेले आहेत.

यावेळी माहीती घेतल्यानंतर इरफान सय्यद रा. कर्जत ता. कर्जत जि. अहमदनगर, तौसिफ रियाजकुरेशी रा. मौलाली माळ ता. करमाळा यांचेविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयाचा पुढिल तपास मा.पोनी घुगे सो यांचे आदेशाने पोहेकाँ राजेंद्र कावळे यांचेकडे दिला आहे.