करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळ्यात मोहरम उत्सवात साजरा ; जवळपास दहा सवारी सहभागी

करमाळा


करमाळा शहर व तालुक्यात मोहरम चा सण उत्सवात व शांततेत साजरा झाला असुन करमाळा शहरात मोहरम निमित्त पाच दिवसापुर्वी सवारी प्रतिस्थापणा करण्यात आली असुन यामध्ये भुई कोट किल्ल्यातील नालसाहेब सवारी, मोहिद्दीन तालीम येथील सवारी कुंभारवाडा येथील अल्लाऊद्दीन साहेब ची सवारी तसेच मौहल्ला गल्ली येथील फरीद मास्तर यांची सवारी खाटीक गल्ली येथील नालेहैदर सवारी खडकपुरा येथील माहुले यांची सवारी तर समद कुरेशी यांची सवारी तसेच रंभापुरा येथील दुधाट यांची सवारी मौलालीनगर येथील मदारी समाजाची सवारीआदी ठिकाणी स्थापना करण्यात आली.

किल्ला वेस, सुमंथनगर, मोहल्ला गल्ली,खाटीक गल्ली, सुर्यकांत चिवटे आदी ठिकाणी डोले बसविण्यात आले असुन वरील सवारीची सवाद्य मिरवणूक शांततेत काढण्यात आली यामध्ये प्रामुख्याने भुईकोट किल्ल्यातील मानाची नालसाहेब सवारी तसेच हिंदू मुस्लिम ऐक्याच प्रतिक म्हणुन बघितले जाते अशी कुंभारवाडा येथील कुंभाराची अल्लाऊद्दीन साहेब सवारी ची मिरवणूक पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी अनेक हिंदू मुस्लिम भावीक रस्त्यावरुन दर्शन घेताना दिसत होते.

‌‌मोहरम चा सण शांततेत पार पाडण्यासाठी नगरसेवक हाजी अल्ताफशेठ तांबोळी माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय शिंदे करमाळा अर्बन बॅकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार भा,ज,पक्षाचे नेते रामा ढाणे अलसहारा सोशल ग्रुप चे संस्थापक हाजी समीर शेख राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे शहर उपाध्यक्ष आजाद शेख हाजी फारुक बेग मुकेश हलवाई जाकीर वस्ताद सारंग परदेशी बबन दुधाट बिलाल कुरेशी जाफर घोडके उमर मदारी देवीदास घोडके माहुले ज्योतीराम ढाणे इस्माईल सय्यद महमदहाफीज कुरेशी मुस्तकीन पठान जिशान कबीर ईमत्याज पठान सुरज शेख, मैनुद्दीन शेख समीर दाऊद शेख, पै,समीर शेख आयुब शेख जावेद पठाणआदी जणांनी परिश्रम घेतले पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे पोलीस उपनिरीक्षक माहुरकर यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता

politics
DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE
Audio Player
WhatsApp Group