वाशिंबे, सावडीत साखळी उपोषणला सुरुवात
करमाळा समाचार
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मागील आठ दिवसांपासून अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे अमरण उपोषण सुरू आहे. त्याला पाठिंबा म्हणून करमाळ्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने तालुक्यातील गावांमध्ये नेत्यांना गावबंदी व साखळी उपोषण करून पाठिंबा दिला आहे.

त्यात आता ग्रामीण भागातूनही पाठबळ मिळत आहे. यापूर्वी ग्रामीण भागातील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी करमाळा शहरात येऊन एक दिवसीय साखळी उपोषणात सहभाग नोंदवला होता. त्यानंतर आता गावोगावी साखळी उपोषणाला सुरुवात केली जात आहे.

त्याचाच भाग म्हणून आज वाशिंबे व सावडी येथे सकल मराठा समाज बांधवांनी साखळी उपोषणास सुरुवात केली आहे. यावेळी बहुसंख्येने मराठा बांधव उपस्थित होते.