करमाळासोलापूर जिल्हा

आदिनाथ कारखान्याबाबत खोटी माहीती देऊन दिशाभुल – बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष गुळवेंचा दावा

समाचार टीम

उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी गेल्यानंतर न्यायालयाने आदिनाथच्या संचालकांना 19 ऑक्टोबर पर्यंत 24 कोटी रुपये भरा असे आदेश दिले आहेत. ते पूर्ण करण्याऐवजी कारखान्याचा ताबा स्वतःकडे घेऊ पाहत आहेत. शिवाय आम्ही कारखाना ताब्यात मागितलेला असतानाही त्याला विरोध केला जात आहे व आता लोकांची दिशाभूल करून संबंधित आदेश आल्याचे सांगितले जात आहे. पण ही सर्व माहिती खोटी असल्याचा दावा बारामती ॲग्रो चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी केला आहे.

माजी आमदार नारायण पाटील तसेच आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे यांच्याकडून डी आर ए टी कोर्टाने 5% रक्कम भरून कारखाना सुरू करण्याबाबत आदेश मिळाले असल्याची माहिती आज दिली होती. पण हीच माहिती खोटी असल्याचा दावा आता बारामती ॲग्रो चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी केला आहे या दाव्याने आता खळबळ उडाली आहे.

वास्तविक पाहता सदर बाब ही उच्च न्यायालयापर्यंत पोहोचली होती व उच्च न्यायालयाने आदिनाथच्या संचालकांना चार आठवड्यांमध्ये संबंधित रक्कम भरण्याची आदेशही दिले होते. परंतु त्यानंतर सदर प्रकरण हे पुन्हा एकदा डीआरएटी कोर्टात पोहोचले व त्या कोर्टाने आज एक निकाल दिला आहे. पण तो निकाल अद्याप कोणाकडे पोहोचला नसल्याने नेमका निकाल काय आहे याबाबत जरी संभ्रम असला तरीही कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे व माजी आमदार नारायण पाटील यांनी ठामपणे सदर निकालाबाबत वक्तव्य करत आहेत.

सदर कारखाना सुरू करण्यासाठी आधीच खूप उशीर झालेला आहे. त्यामुळे कारखान्याचा ताबा घेऊन बारामती ऍग्रो ही कारखाना सुरू करण्याची मागणी करत होते. तर आदिनाथच्या संचालकांनीही सदरची पूर्वतयारी आम्ही सुरू करू कारखाना बारामती ऍग्रो कडे न देता आमच्या ताब्यात द्यावा असा युक्तिवाद केल्याने सदर ताबा हा आदिनाथच्या संचालकाकडे दिल्याचे स्वतः गुळवे यांनीही मान्य केले आहे. पण संचालक मंडळ हे पैसे भरू शकत नाही.त्यामुळे कारखाना यंदाही सुरू होईल का नाही असा प्रश्न गुळवे उपस्थित केला.

तरी या संदर्भात बोलताना कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे यांनी सांगितले आहे की, बँकेच्या वतीने नवीन योजना तयार करण्यात आली आहे. त्याच्या माध्यमातून कर्जाच्या 5% रक्कम भरल्यानंतर कारखाना सुरू केला जाऊ शकतो. त्यामुळे केवळ तीन कोटी 17 लाख रुपये भरल्यास कारखाना सुरू होऊ शकतो आणि त्यासाठी आम्ही तारखेची वाट न बघता पूर्वीच ही रक्कम भरून कारखाना सुरू करणार असल्याचा दावा डोंगरे यांनी केला आहे. त्यामुळे नेमका कोणाचा दावा खरा व कोणाचा खोटा हा निकालाची प्रत समोर आल्यानंतरच कळेल.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE