सातवली येथील चंद्रकांत मेटे या शेतकऱ्यांने दुर्मिळ होत असलेल्या पिकाचे घेतले उत्पादन
विटामिन सी चे प्रमाण जास्त असल्याने बाजारात मागणी वाढली..
करमाळा समाचार – संजय साखरे

सोलापूर जिल्ह्यातील सातवली गावचे तरुण बागायतदार श्री चंद्रकांत शंकराव मेटे यांनी स्वतःच्या शेतावर एक अनोखा प्रयोग केला आहे. सध्याच्या आधुनिक शेतीच्या युगामध्ये दुर्लक्षित झालेले शेंदाड नावाची पिक त्यांनी आपल्या शेतावर चार एकर क्षेत्रांमध्ये लागवड केली आहे
श्री चंद्रकांत शंकराव मेटे यांनी शेंदाड पीक निवड करून मानवी आहारामध्ये अत्यंत उपयोगाचे पिक लावून एक अनोखा प्रयोग साकार करण्याचा प्रयत्न केला आहे. आहारामध्ये शेंदाड पिकास अनन्यसाधारण महत्त्व आहे शेंदाड मध्ये विटामिन सी जास्त प्रमाणात असते आणि त्यामुळेच या पिकाला बाजारामध्ये जास्त मागणी आहे. हा अनोखा प्रयोग श्री चंद्रकांत शंकराव मेटे यांनी साकार करण्याचा प्रयत्न केला आहे.

शेंदाड या पिकाची लागवड महाराष्ट्रामध्ये व्यापक प्रमाणामध्ये होत नाही. परंतु हे माळराणावर चे पिक श्री मेटे यांनी शेतामध्ये लावल्यामुळे परिसरातील लोक परिसरातील शेतकरी तज्ञ वर्ग या पिकाची पाहणी करण्याकरता श्री मेटे यांच्या शेतावरती भेट देत आहेत. श्री मेटे यांचा हा प्रयोग जर यशस्वी झाला विशेषकरून बाजारपेठ चांगल्या प्रकारे उपलब्ध झाली तर या पिकाची व्यापक प्रमाणामध्ये लागवड होऊ शकते आणि त्याचा फायदा मानवी आरोग्यास चांगल्याप्रकारे होऊ शकतो.
संकरीत वानाच्या अतिक्रमाने देशी वान नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यातच शेंदाड हि जात तर फार दुर्मिळ होत चालली असून कमी कालावधीत जास्त उत्पादन मिळावे म्हणून संकरीत वानाकडे शेतकरी वळाला आहे. परंतू देशी वान हे मनुष्याला आरोग्यदाई आहे आणि हेच शेंदाड या पिकात असून यात विटामिन सी चे प्रमाण भरपूर असून कोरोना काळात हे शरीरास अतिशय उपयुक्त फळ आहे. त्यामुळे याला मागणी वाढली आहे.
– चंद्रकांत मेटे सातवली ता.करमाळा जिल्हा सोलापूर.