करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

राजकारणातील बदलती समिकरणे – बागल गटाकडुन गटाचे “प्रिंस” मैदानात उतरवण्याची तयारी

करमाळा समाचार 

तालुक्याच्या राजकारणात दमदार गट मानला जात असलेल्या बागल गटाने आता नवा डाव टाकला आहे. तालुक्यात तीन वेळा 1995, 1999 ( स्व. दिगंबरराव बागल), 2009 (शामल बागल) आमदार पद भूषवलेल्या बागल कुटुंबातून युवा चेहऱ्याला संधी देण्यात आली होती पण अवघ्या 257 (2014) मतांनी पराभव झाल्यानंतर पुन्हा मात्र बागल गट सावरताना दिसला नाही. 2019 मध्ये बागल गट तालुक्याच्या राजकारणात तिसऱ्या क्रमांकावर जाऊन थांबला. अशा परिस्थितीत आता पुन्हा एकदा नवी खेळी बागल गटाकडून करण्यात आली आहे.

2014 च्या निवडणुकीमध्ये रश्मी बागल यांना 60 हजार 417 मते मिळाली होती. यावेळी नारायण आबा पाटील हे केवळ 257 विजयी झाले होते. केवळ 257 मतांनी हा झालेला विजय बागल गटाच्या आशा जिवंत ठेवणार होता. नंतर राजकारणात मोठ्या प्रमाणावर बदल होत गेले. कारखान्यांमध्ये झालेली पीछेहाट याचं खापर बागलांवर फुटले. त्यामुळे बागल गट तिसऱ्या स्थानावर जाऊन पडला. 2019 च्या निवडणुकीमध्ये रश्मी बागल अवघ्या 53 हजार 295 मतांवर समाधान मानावे लागले होते.

politics

यंदाच्या निवडणुकीत मकाई व आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अडचणींमुळे बागल गट आधीच मोठ्या प्रमाणावर पिछाडीवर असल्याचे दिसून येत होता. लोकसभा निवडणुकांच्या कार्यकाळात बागल गटाने त्यातून सावरण्याचा प्रयत्न केला. मकाईसाठी कर्ज प्रकरण मंजूर करून थकीत रक्कम देण्याचे काम यावेळी करण्यात आले. त्यामुळे थोडासा बॅकफूटवर गेलेला बागल गट पुन्हा एकदा मैदानात उतरला. पण या कार्यकाळात बरसा वेळ निघून गेला होता. त्यामुळे विधानसभेत बागल गटाला पुन्हा एकदा विस्कटलेली घडी पुन्हा बसवायची आहे.

अशा परिस्थितीत रश्मी बागलच पुन्हा एकदा मोठा पर्याय असू शकले असते. त्यांनी नुकताच भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. सध्या त्यांचं भाजपमध्ये वाढत चाललेलं वजन याचा फायदा बागल गट तसेच करमाळा तालुक्यातला होताना दिसणार आहे. परंतु त्यांनी ऐन वेळी निवडणुकातून माघार घेतली व नवीन डाव बागल गटाकडून टाकण्यात आला आहे. रश्मी बागल यांनी निवडणुकीतून माघार घेत बंधू दिग्विजय बागल यांचे नाव समोर केले आहे. सदरची खेळी यशस्वी होईल का आहे येणारा काळच ठरवेल.

दिग्विजय बागल यांना समोर करत रश्मी बागल यांनी युवकांमध्ये व पिछाडीवर पडलेल्या बागल गटांमध्ये एक नवी ऊर्जा आणण्यासाठी सदरचा डाव खेळण्याचे सांगितले जात आहे. पण यामागे पक्ष व बागल गट यांची भूमिका नेमकी काय हे अजूनही गुलदस्त्यात आहे. स्वतः माघार घेऊन बंधू दिग्विजय बागल यांना मैदानात उतरवल्यानंतर तालुक्याच्या राजकारणात बागल गटात अस्तित्व कायम ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. महायुती सोबत राहून दिलेल्या उमेदवाराला पाठिंबा देण्यापेक्षा स्वतः मैदानात उतरून बागल गट पुन्हा एकदा शक्तिशाली बनवणे हा प्रमुख उद्देश बागल यांचा दिसून येतो.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE