करमाळासोलापूर जिल्हा

वेगवेगळ्या गुंह्यात हवा असलेल्या मनोहर मामाला साताऱ्यात ; पुणे पोलिसांच्या ताब्यात असल्याबाबत माहीती

करमाळा समाचार 

मनोहर भोसले उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) याला पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलिसांनी साताऱ्यात पकडले. त्याला ताब्यात घेण्यात आले असून लवकरच अटक केली जाणार आहे अशी माहीती मिळत आहे. नेमके पुढे काय हे लवकरच समोर येईल.

बारामती येथील 23 वर्षीय तरुणाने फिर्याद दिल्यानंतर मनोहर भोसले (manoharmama) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑगस्ट 2018 ते ऑगस्ट 2019 च्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. वडिलांच्या गळ्यातील थायरॉईड कॅन्सर बरा करतो असे सांगून बाभळीचा पाला,साखर, भंडारा खाण्यास देऊन विशाल वाघमारे, ओंकार शिंदे व मनोहर भोसले यांच्याविरोधात वेळोवेळी संगणमत करून दोन लाख 12 हजार 500 रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच करमाळ्यातही महिलेवर सामुहीक आत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

मनोहर भोसले यांच्या विरोधात मागील अनेक दिवसांपासून विविध तक्रारी येत होत्या. परंतु त्यावर फक्त चौकशी सुरू असल्याचे समोर येत होते. परंतु आता बारामती पोलिसांनी मनोहर भोसले यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने सर्वत्र खळबळ उडाली. यापूर्वीही करमाळा तालुक्यात इंदापूर येथील रवींद्र राघू म्हेत्रे यांनी फसवणूक झाल्या प्रकरणी तक्रार दिली होती. त्यावर अद्यापही चौकशी सुरू आहे.

मनोहर भोसले यांच्यासह तिघांवर बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी त्यांच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा व उच्चाटन कायदा 2013 चे कलम 3,2 औषध चमत्कारी उपाय अधिनियम व नियम 1954 चे कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर करमाळ्यात आत्याचार, खंडणी जादुटोणी कलमे लावण्यात आली आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE